सांगोल्यातील तब्बल ६ उडाणटप्पू डाॅक्टरांचा लोणावळ्यात नंगानाच
सांगोला :
सांगोला शहर व तालुक्यातील गोरगरीब तसेच सर्वसामान्य रुग्णांना औषधोपचाराच्या नांवाखाली लुबाडून तोच जादा झालेला पैसा बाहेरगांवी जावून आपल्या चैनीसाठी गुपचुपपणे उधळणार्या व मजा मारणार्या सांगोल्यातील कांही नामवंत डाॅक्टरांच्या अंधारी रात्रीच्या अश्लिलतेची खरी बाजू अखेर उजेडात आलीच असून सांगोल्यातील तब्बल ६ उडाणटप्पू डाॅक्टर हे कांही महिला व बारबालांसह डीजेच्या तालावर बेभान होवून अश्लिल डान्स करताना लोणावळा पोलीसांनी अचानक छापा टाकून शनिवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले व त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आजारी पडल्यानंतर देवाचा धावा करण्याबरोबरच जीव वाचवणारा पृथ्वीतलावरील दुसरा देव म्हणूनच ज्याच्याकडे पाहिले जाते, त्या डाॅक्टरकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन कितीतरी चांगला असतो. पण,त्यांच्यातीलच कांही घाणेरड्या व बीभत्स प्रवृत्तीच्या डाॅक्टर्समुळे संपूर्ण वैद्यकिय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलतो. अगोदरच, कोरोनाच्या कालावधीत या वैद्यकिय क्षेत्रातील मंडळींनी पेशंटना भिती घालून मिळवलेली अफाट माया व त्यांची बदललेली जीवनशैली पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात आता या मंडळींबद्दल पूर्वीसारखा आदर राहिलेला नाही. त्यातून पुन्हा रुग्णाच्या आजारपणाचा फायदा घेवून या मंडळींनी त्यांचेकडून ओरबाडलेल्या पैशाचा उपयोग ते अशापध्दतीने चैन,मजा व अश्लील कामांसाठी करत असतील तर, त्यांचेविषयी घृणा ही निर्माण होणारच.
पंख्याखाली व ए.सी.खाली बसून रुग्णांना लुटणार्या या डाॅक्टर्सना विनासायास व सहजपणे मिळत असलेल्या जादा पैशाची मस्ती ही येणारच. ही मस्ती व मौजमजा करण्याच्या उद्देशाने सांगोल्यातील डाॅक्टरांची सहाजणांची ही उडाणटप्पू टोळी (या सहापैकी एक मुस्लीम डाॅक्टरही आहे,हे पाहून आश्चर्य वाटले.सध्या रमजानचा पवित्र महिना चालू असून अशा पवित्र रोजाच्या महिन्यात अल्लाहच्या उपदेशाची प्रतारणा करणार्या या डाॅक्टरला असा बीभत्स प्रकार करताना लाज कशी वाटली नाही ?) सांगोल्यापासून लांब असलेल्या लोणावळा येथे जावून तिथल्या शर्मा बंगल्यावर रात्रभर बाया नाचवत स्वत:ही बेभान होवून त्यांचेबरोबर डीजेच्या तालावर अश्लील डान्स करत असताना (नुसता डान्सच केला की आणखी कांही केले ? ते छापा टाकणार्या पोलीसानांच माहीत) लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक व त्यांच्या पथकाने त्यांना रेडहँड ताब्यात घेतले आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्यात त्यांचेविरुध्द भा.दं.वि.कलम २९४, १८८,३४ व म.पो.कायदा कलम ३३ (N),१३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घडीला या सर्व डाॅक्टर्सची नांवे याठिकाणी जाहीर न करता त्यांना यापुढे चांगली वर्तणूक ठेवण्याची संधी देत असून याउपरही, या डाॅक्टर्सकडून भविष्यात कधी असा प्रकार यदाकदाचित घडलाच तर मात्र, त्यांचा व्यवसाय बंद केल्याशिवाय राहणार नाही,हे निश्चीत.(ता.क. – लोणावळ्यात गुन्हा दाखल झाल्याने वरील डाॅक्टरांचे पितळ उघडे पडले.पण, आणखी कांही छुपेरुस्तम डाॅक्टर्सही आहेत,ज्यांच्या अशाच कांही भानगडी आत्तापर्यंत तरी झाकरित राहिल्या असल्या तरी,त्यांचाही लवकरच पर्दाफाश होईल.)—————————————————————————
नवर्यांनो बायका सांभाळा :
सांगोल्यातील कांही डाॅक्टर मंडळीच्या अशा अश्लील व बीभत्स प्रवृत्तीमुळे आता इथून पुढे आपल्या घरच्या महिला आजारी पडल्यानंतर त्यांना एकट्याने पाठवायचे की नाही ? याचा विचार केलेलाच बरा.त्यामुळे,”नवर्यांनो आपल्या बायका सांभाळा” असे म्हणण्याची वेळ आता सांगोलावासीयांवर आलेली आहे.आता इथून पुढे,आजारी पडल्यावर आपल्या घरातील महिलांना लेडीज डाॅक्टरकडेच पाठवणे योग्य होईल, अशीही चर्चा होवू लागली आहे.
—————————————————————————