भाळवणी गटातील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांचा उध्दवसेनेत जाहीर प्रवेश
दीपकआबांना भाळवणी गटातून विक्रमी मताधिक्य देण्याचा तरुणांचा निर्धार
सांगोला :
जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येवू लागली आहे,तसतसा सांगोला विधानसभा मतदार संघातील बलाढ्य असा शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्त्यांविना खिळखिळा होत चालला असून एकसंघ म्हणवून घेणार्या शेकापला दररोज एकापाठोपाठ एक हादरे बसू लागले आहेत. शेकापमधील मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला विधानसभा मतदार संघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे (उबाठा शिवसेना गटाचे) अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश केलेल्या सर्व तरुणांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना भाळवणी जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेकाप मधील मनमानी कारभाराला कंटाळून तसेच सध्याचे शेकापचे नेतृत्व हे विश्वासात घेत नसल्याने सांगोला विधानसभा मतदार संघातील भाळवणी गटातील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शेकापची साथ सोडत दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीत शेकापला जबरदस्त धक्का बसला आहे.
यावेळी शिवसेनेचे युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील यांनी उपस्थित सर्व तरुणांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत केले आणि आगामी काळात ज्या अपेक्षेने आपण दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे,त्या विश्वासाला अजिबात तडा जाणार नाही,असा विश्वास व्यक्त केला.युवानेते आकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश पार पडले.यावेळी गिरीश पाटील सर,सोमनाथराव गोरे,विठ्ठलकाका बेहरे, अमरदादा लोखंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करत शिवसेनेची मशाल हाती घेतली.
——————————————————————————
शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करुन मशाल हाती घेतलेले कार्यकर्ते :
रोहित भोसले,निखिल भोसले, प्रतीक चव्हाण, आकाश लांडगे,आकाश सावंत,विक्रम साठे,अमित भोसले,मोनू गायकवाड, धीरज गायकवाड,राजदीप गायकवाड,सुरज गायकवाड, सुमित गायकवाड,अनिल गायकवाड,मिलिंद कांबळे, विजय लोखंडे,अजय लोखंडे,सचिन गायकवाड, बबलू गायकवाड,संजय लोंढे,ज्ञानेश्वर लोखंडे,अमर सातपुते,गणेश कांबळे, सिद्धार्थ गायकवाड,निखिल भोसले,अशोक चव्हाण, लखन सावंत,विनायक सावंत,बबलू सावंत,सचिन सावंत,प्रफुल्ल गायकवाड, अविनाश गायकवाड, अविनाश कुचेकर,प्रवीण कुचेकर,संग्राम पवार,समर्थ पाले,किरण लोखंडे,सागर लिंगे,धुळा गायकवाड,बंडू शिंदे,आनंद चव्हाण, समाधान साठे,संदीप पवार,समाधान गायकवाड, बबन (दादा) शिंदे,राहुल गायकवाड,समीर काझी, दादा गायकवाड,मिलिंद गायकवाड,आकाश कुंभार, माऊली लांडगे,सागर तारळकर,इसुफ तांबोळी, संदीप पवार,शंकर पवार, गौरव पवार,सुभाष गायकवाड,अजित गायकवाड,श्रीमंत साठे या शेकापच्या भाळवणी गटातील कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करुन मशाल हाती घेतली आहे.