य.मंगेवाडी येथील शेकाप व उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आ.शहाजीबापूंच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेत प्रवेश

 आ.शहाजीबापू यांना विक्रमी मताधिक्य देवून कॅबिनेट मंत्री करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे कार्यकर्त्यांचे आश्वासन

 

सांगोला :

सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला येथील आ.शहाजीबापूंच्या जनसंपर्क कार्यालयात येवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत रविवारी ३ नोव्हेंबर रोजी पक्षप्रवेश केला.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,कार्यकर्त्यांनी आपले योगदान देवून जास्तीत जास्त मतदान कसे होईल,यासाठी प्रयत्न करावेत.कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी प्रसंगी आपण सर्वतोपरी सहकार्य करु,असा ठाम विश्वासही आ.शहाजीबापू यांनी कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी या गावातील ज्येष्ठ मान्यवर व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करुन कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करु,असे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले.
——————————————————————————

खालील कार्यकर्त्यांनी केला जाहीर प्रवेश :

शेतकरी कामगार पक्ष व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पांडुरंग विभुते,लक्ष्मण जावीर,अक्षय निकम, महादेव चव्हाण,चंद्रकांत काटे,संतोष नामदेव येलपले, विकास कांबळे,नवनाथ कांबळे,सिध्दू जाधव, विकास चौगुले,नितीन चौगुले,तानाजी जावीर,बिरा जावीर,रोहित जावीर,विजय जावीर,सुभाष घाटुळे,उत्तम ऐवळे,बाळासाहेब वलेकर, अक्षय जावीर,अमोल जावीर,दत्तात्रय ऐवळे,विजय येलपले,श्रीकांत विलास येलपले,सचिन काटे, हर्षवर्धन काटे,धनंजय गोरख काटे,सुभाष नारायण काटे,वैजनाथ काटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.या कार्यकर्त्यांनी विशाल चव्हाण व परमेश्वर केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली  हा पक्ष प्रवेश केला.