सामाजिक

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सांगोला नगरपरिषदेकडून गुरुवारी होणार ज्येष्ठांचा सन्मान

सांगोला :

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवातून समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेतली जाणार आहे.

सांगोला शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या सन्मान सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी,सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनी केले आहे.
=========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button