शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर :

पावसाअभावी सोलापूर जिल्ह्यातील शेती व्यवसायावर मोठे आर्थिक संकट आले असून शेतकरी वर्ग पूर्णपणे नैराश्याचे जीवन जगत आहे.त्यामुळे,तात्काळ पंचनामे करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकारी,सोलापूर यांना भाजपा किसान मोर्चा सोलापूर जिल्हा पूर्वच्या वतीने नुकतेच एक निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन देतेवेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख,जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड,जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, सरचिटणीस नितीन कारंडे व इतर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
===================================