सामाजिक

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पाच गरजू महिलांना शेळी व शिलाई मशीन भेट

सांगोला :

सांगोला येथे ‘आपुलकी प्रतिष्ठान’च्या वतीने सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील चार तर,सांगोला येथील गरजू महिलेला उदरनिर्वाहासाठी शेळी व शिलाई मशीन भेट देण्याचा कार्यक्रम रविवारी आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय येथे पत्रकार दीपक भाकरे व प्रवीण घोंगडे यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना पत्रकार दीपक भाकरे म्हणाले की,शासन आणि प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यास काही वेळा विलंब होतो मात्र, ‘आपुलकी प्रतिष्ठान’ने वेळेत गरजूंपर्यंत पोहोचून अनेक संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा आधार दिला असून याच सामाजिक जाणिवेतून आणि पाठबळामुळे प्रतिष्ठानचे कार्य आज सर्वदूर पोहोचले आहे,असे सांगून गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करणे हे सर्वात मोठे पुण्य असून,आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य अविरतपणे हाच वसा जोपासत आहेत,असे ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पत्रकार प्रवीण घोंगडे यांनी सांगितले की,दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून व प्रतिष्ठानच्या प्रामाणिक भूमिकेमुळे आज अनेक कुटुंबांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत असून हा उपक्रम इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी आहे.या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाचे साधन मिळाले असून परिसरातील नागरिकांनी ‘आपुलकी प्रतिष्ठान’च्या या समाजोपयोगी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

प्रारंभी,आपुलकीच्या वतीने पत्रकार दीपक भाकरे यांचा सुरेशकाका चौगुले यांच्या हस्ते तर,प्रवीण घोंगडे यांचा गोविंददादा माळी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले तर,आभार सचिव संतोष महिमकर यांनी मानले.
                      =========================

एकल व गरजू महिलांनी आपुलकीच्या कार्यालयात संपर्क साधावा :

सांगोला तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या एकल व गरजू महिलांनी शिलाई मशीन किंवा शेळीसाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयात संपर्क साधून अर्ज भरुन द्यावा.सर्व्हे केल्यानंतर योग्य वाटल्यास त्यांना मदत देता येईल.                            – राजेंद्र यादव : अध्यक्ष आपुलकी प्रतिष्ठान
=========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button