सांगोला :
चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या सर्व्हेनुसार,नागरिकांना करवाढीच्या नोटीसा देण्यात आल्या असून नागरिकांनी कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.घरपट्टीत कसलीही दरवाढ करण्यात आलेली नाही तर,नागरिकांनी केलेल्या वाढीव बांधकामामुळे झालेली ही करवाढ असल्याची माहिती नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांनी दिली आहे.
नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने पुढे म्हणाले की,सांगोला शहरातील काही नागरिकांनी आपल्या राहत्या घरातील मालमत्ता इमारतीमध्ये अलिकडे बदल केलेला असल्याने म्हणजेच वाढीव बांधकाम केलेले असल्याने किंवा रहिवाशी पत्राशेडचे दुकान गाळ्यामध्ये रुपांतर केल्याने सध्य:स्थितीत सांगोला नगरपरिषदेच्या कर विभागाकडून करण्यात आलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या सर्व्हेनुसार (मोजमापानुसार) ही करवाढ झालेली आहे.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या अगोदर यापूर्वी टॉयलेट,बाथरुम,जिना,पॅसेज व खुली जागा यांना कर आकारण्यात येत नव्हता.परंतु, आता नवीन चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये टॉयलेट, बाथरुम,जिना,पॅसेज व खुली जागा यांचा सुद्धा समावेश केला असल्याने करवाढ झालेली दिसून येत आहे. सदरचा कर हा मालमत्ता इमारतीच्या वापरामध्ये बदल केल्यामुळे वाढला असून करामध्ये कसलीही दरवाढ करण्यात आलेली नसल्याचेही नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांनी यावेळी सांगितले.
=========================
कर आकारणीबाबत 31 ऑगस्ट पर्यंत हरकत अर्ज द्यावेत :
सांगोला शहरामध्ये एकूण 16 हजार 778 इतक्या मालमत्ता इमारती आहेत. त्यापैकी, 13 हजार 066 एवढ्या मालमत्ता इमारतींचे नोटीस वाटण्याचे काम पूर्ण झाले असून ज्या नागरिकांना नोटीस मिळाल्या नाहीत, तसेच नोटीस मिळालेल्या ज्या नागरिकांच्या तक्रारी किंवा आक्षेप आहेत,त्यांचे हरकती अर्ज घेऊन तक्रार निवारण करण्यात येणार असल्याने नागरिकांनी नगरपरिषदेच्या कर विभागाकडे दि.31 ऑगस्ट पर्यंत हरकत अर्ज द्यावेत.
– नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
==========================
More Stories
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन
दादर-पंढरपूर-दादर रेल्वेला ‘चंद्रभागा एक्सप्रेस’ नाव देऊन ती दररोज सुरु करा – खा.धैर्यशील मोहिते-पाटील