सांगोल्यात शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश
सांगोला :
शेकापकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून य.मंगेवाडी (ता.सांगोला) येथील येथील शिवसेना उबाठा व भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत नुकताच शेकापमध्ये प्रवेश केला.
सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील उबाठा शिवसेना गटातून संजय भडंगे,लक्ष्मण जावीर आणि बाळासाहेब दादासो कोकरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी उध्दवसेना आणि भाजपामधून शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.नवीन पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेना उबाठा व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकापमध्ये प्रवेश केला.
उबाठा शिवसेना व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना यलमार मंगेवाडी गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शेकापमध्ये प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये जो अनागोंदी कारभार सुरु आहे, त्यामुळे जनता प्रस्थापितांना वैतागलेले असून त्यामुळे शेकापमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत.शेतकरी कामगार पक्षाने गेल्या ५ वर्षाच्या काळात अनेक गोष्टींना वाचा फोडली आहे. गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरुन वेळप्रसंगी आंदोलनेही केली आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून शेकापचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याबद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत देखील शेकापचा दणदणीत विजय होणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
——————————————————————————