राजकीय

यंदा उध्दवसेनेची मशाल पेटविण्याचा तरुणांनी केला निर्धार

जवळा परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांचा उध्दवसेनेत प्रवेश

सांगोला :

सोलापूर जिल्ह्याचे नेते दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगोल्यात शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी रीघ लागली असून दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा अभेद्य गड अशी ओळख असणाऱ्या जवळा परिसरात दीपकआबांची ताकद वाढतच चालली आहे. तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशांचा धडाका सुरु आहे.जवळा,तरंगेवाडी,भोपसेवाडी,बुरंगेवाडी व आगलावे वाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी उध्दवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे-पाटील यांना आमदार करुन यंदा पुन्हा एकदा सांगोला विधानसभा मतदारसंघावर मशाल पेटवून उध्दवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार तरुण कार्यकर्त्यांनी केला आहे.

माजी आमदार दीपकआबा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेकांचे पक्षप्रवेश धूमधडाक्यात सुरु आहेत. दीपकआबा यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे पक्ष संघटन अधिक मजबूत स्थितीत उभे राहिले आहे. सांगोला तालुक्यातील जवळा, तरंगेवाडी,भोपसेवाडी, बुरंगेवाडी व आगलावेवाडीतील कार्यकर्ते संतोष मळगे,अरविंद बुरंगे,नंदू मेटकरी (मेंबर),चंदू खांडेकर, बिरा कोळेकर,आबा मागाडे,संतोष बुरंगे,बलभीम मागाडे,तात्या खांडेकर,युवराज मळगेबिरा खांडेकर, म्हाळु बुरंगे,गणेश हालगंडे,अविनाश मागाडे,बाबू मागाडे,श्रीमंत मोचे,सौरभ मागाडे,गोरख मागाडे,रोहित सुर्वे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करुन मशाल हातात घेतली. यावेळी दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे समर्थक,उध्दवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button