शैक्षणिक

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न

सांगोला :

सांगोला तालुक्यात माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेचे 12 ते 18 वयोगटातील किशोर व किशोरींसाठी ‘किशोर-किशोरी विकास वर्ग’ सुरु असून त्यामध्ये,किशोर-किशोरींच्या व्यक्तिमत्व विकास वाढीचे उपक्रम घेतले जातात.सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे महूद येथील आदर्श इंद्रजीत विद्यालय मधील इ.6 वी ते 9 वी मधील मुलींसाठी ‘प्रेम,मैत्री,स्वैराचार व आचार’ या विषयी कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी,आदर्श इंग्लिश विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उमेरा तांबोळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान,सांगोला संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी कुलकर्णी यांनी ‘प्रेम,मैत्री’ याबाबत मार्गदर्शन करताना मैत्री म्हणजे काय ?, मित्र-मैत्रीण कसे असावेत ? तसेच मैत्रीतील सकारात्मक व नकारात्मक दबाव कसा असतो ? हे काही उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.भिन्नलिंगी मैत्री तसेच प्रेम व आकर्षण यामधील फरक समजावून सांगितला.

त्याचप्रमाणे संस्थेच्या कार्यकर्त्या संपदा दौंडे यांनीही मुलींना आईसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून सर्वच गोष्टी प्रथम आईशी बोलाव्यात,असे सांगितले.त्यांनीही अन्याय निवारण समितीमध्ये आलेले अनुभव सांगत मुलांशी मैत्री असणे गैर नसून फक्त मुलीनी आपल्या मर्यादा सांभाळाव्यात.तसेच मैत्री मध्ये कोणाच्याही आयुष्यावर परिणाम होईल,अशी चेष्टा मस्करी करु नये,असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व समारोप आदर्श विद्यालयाच्या शिक्षिका सौ.ऋतुजा होळकर यांनी केले.यावेळी एकूण ९५ विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button