माजी आम.शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस ‘आरोग्य सप्ताह’ म्हणून होणार साजरा
आरोग्य सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा - रफिकभाई नदाफ

सांगोला :
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि.15 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान,त्यांचा वाढदिवस ‘आरोग्य सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार व यानिमित्त सांगोला शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे व शहराध्यक्ष सोमेश यावलकर यांनी दिली.
या आरोग्य सप्ताहात नेत्र तपासणी,मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया,चष्मे वाटप,हृदयविकार, बायपास शस्त्रक्रिया,स्नायूंचे आजार, हाडांची ठिसूळपणा तपासणी तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवर आवश्यक तपासणी व उपचारांच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
=========================
आरोग्य सप्ताहाचा अवश्य लाभ घ्यावा :
सांगोला शहरासह तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून या माध्यमातून गरजू नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व उपचारांच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
तरी,माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य सप्ताहाचा सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा. – माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ
==============



