म.गांधी जयंतीनिमित्त माजी खा.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून सांगोल्यातील कवी व साहित्यिकांचा गौरव

सांगोला :
माजी खासदार तथा माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधूनसांगोला
तालुक्यातील कवी व साहित्यिकांची सदिच्छा भेट घेत,समाजप्रबोधन,साहित्य निर्मिती आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने त्यांच्या साहित्यिक कार्याचा सन्मान व गौरव केला.

साहित्य हे समाजाचा आरसा असून कवी व साहित्यिक आपल्या लेखणीतून समाजातील विविध प्रश्न, भावना व वास्तव प्रभावीपणे मांडत असतात.त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत होण्यास मदत होते.अशा साहित्यिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे,या भावनेतून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून सांगोला तालुक्यातील साहित्यिकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.या भेटीमुळे साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये सुसंवादाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी प्रा.विश्वनाथ आव्हाड, महेश नलवडे,चिटणीस दादाशेठ बाबर,अनिल जगदाळे,सुरेश पवार,सरपंच नामदेव पवार,धनश्री पवार, उद्धव पाटील,भीमाशंकर पैलवान सर,प्राचार्य हेमंतकुमार आदलिंगे,राहुल चव्हाण,माजी सरपंच महादेव पवार,माजी सरपंच विजय पवार,माजी सरपंच आळसुंदकर व अशोक पाटील गुरुजी,बाजार समिती संचालक धनाजी पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
===========================
सत्कारमूर्ती :
सुनील जवंजाळ,सागर भजनावळे,फारुख काझी, प्रेमकुमार वाघमारे,शिवाजी बंडगर,ज्योतीराम फडतरे, अॅड.महादेव कांबळे, ज्ञानेश्वर डोंगरे आणि होवाळ यांचा सन्मान करण्यात आला.
==============



