जिल्हाधिकाऱ्यांनी सांगोल्यात केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

सांगोला :
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळीपरिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर,सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी काल शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी
सांगोला तालुक्यातील विवीध गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दुष्काळी
परिस्थितीचा आढावा घेण्याच्या उद्देशाने काल शुक्रवारी सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे, वाकी-घेरडी,बुरलेवाडी, राजापूर व वाढेगाव
इ.गावात जाऊन तेथील शेतीमधील पीकांच्या नुकसानी बाबतची प्रत्यक्ष पाहणी केली.सदर भेटीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी स्वतः त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. ===========================
उपस्थित अधिकारी व कर्मचारी :
यावेळी त्यांच्यासोबत मंगळवेढा विभागाचे उपविभागीय अधिकारी माळीसाहेब,सांगोल्याच्या तहसीलदार बाळूबाई भागवत, सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी(बिडीओ), कृषी अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, पाणीपुरवठाअधिकारी, कृषी मंडळअधिकारी, मंडल अधिकारी,ग्राम महसूलअधिकारी, ग्रामसचिव व कृषी सहाय्यक इ.उपस्थित होते.
==============



