स्वयंअर्थ सहित शाळांचे प्रश्नासाठी संघटना सक्रिय
सांगोला :
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सर्वांगीण विकास,शैक्षणिक गुणवत्ता,प्रगती तसेच संस्थाचालकांच्या विविध प्रश्नांसाठी राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा एफ) अंतर्गत सांगोला, पंढरपूर,माळशिरस व मंगळवेढा या 4 तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी शिवाजी लाडे यांची तर,सांगोला तालुकाध्यक्षपदी आप्पासाहेब कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदरची अधिकृत निवड ही मेस्टा-एफचे प्रदेशाध्यक्ष हरीश शिंदे,प्रदेश सचिव गणेश निळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष वलगे,सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे, उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण,सचिव शरद कवळस व सोलापूर जिल्हा संघटक गणपत मोरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.यावेळी सोलापूर जिल्ह्यातील चारही तालुक्यांमधील संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित संस्थाचालकांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा-एफ) ही राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित व इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्थाचालकांना एकत्र आणणारी संघटनात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते.स्वयंअर्थसहाय्यित शाळांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक,प्रशासकीय,आर्थिक तसेच विविध धोरणात्मक प्रश्नांवर शासन व संबंधित यंत्रणांकडे संस्थाचालकांच्या वतीने पाठपुरावा करणे,शाळांच्या अडचणी मांडणे,संस्था चालकांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन व जनजागृती करणे,ही या संघटनेची प्रमुख कार्ये आहेत.
येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या विविध मागण्या,समस्या आणि प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मेस्टा-एफच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी अपूर्व सावंत यांनी आभार मानले.स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या विविध मागण्यांसाठी येणाऱ्या काळात संघटनेकडून विशेष प्रयत्न केले जातील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
===================================
More Stories
मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून त्याचा उपयोग ज्ञान व कौशल्य विकासासाठी करावा – प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड
नियमांचे पालन करणे हाच देशाचा आदर करण्याचा सर्वात सोपा मार्ग – पो.उपनिरीक्षक भारत वाघे
शिवाजी पॉलिटेक्निकच्या संगणक विभागातील शुभम माने ९८.३५ टक्के गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम