आरोग्य

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी,शेतमजूर व गरजू रुग्णांना खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा दिलासा

मोफत उपचार,सवलतीच्या दरात तपासण्या व शस्त्रक्रियांची सुविधा

सांगोला :

सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती व त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत पात्र गरजू रुग्णांना मोफत उपचार तसेच अल्पदरात तपासण्या व शस्त्रक्रिया या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी,शेतमजूर व गरजू रुग्णांना खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने दिलासा मिळणार आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांना अनेकदा वेळेवर उपचार घेणे शक्य होत नाही. विशेषतः दुष्काळाच्या काळात शेतकरी आणि शेतमजुरांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीत आरोग्यावरील खर्चाचा अतिरिक्त भार कमी व्हावा आणि गरजू रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावेत, या उद्देशाने खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या सुविधेंतर्गत बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) तपासणी,विविध वैद्यकीय चाचण्या,रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च तसेच आवश्यक शस्त्रक्रियांच्या दरात सवलत देण्यात येणार आहे. गरजेनुसार मोफत किंवा अल्पदरातील उपचारांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
        =========================

हॉस्पिटलने घेतलेल्या या निर्णयाचे होतेयं कौतुक :

आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित रहावे लागू नये,या भावनेतून खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने
घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.        ==============

२४ तास आरोग्यसेवा उपलब्ध :

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत असून गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या
वतीने करण्यात आले आहे.
==============

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button