आरोग्य

सांगोल्यात ‘चैतन्य हास्य योग’ मंडळातर्फे जागतिक योग दिनाचे आयोजन

सांगोला :

    येथील ‘चैतन्य हास्य योग मंडळा’च्या वतीने रविवारी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिना’चे भव्य आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम सांगोला विद्यामंदिर येथे सकाळी ठीक ७.१५ वाजता संपन्न होणार आहे.या विशेष उपक्रमात सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जगताप सर यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण जगभरात गेल्या १२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे.निरोगी व तणावमुक्त जीवनशैलीसाठी योगासनांचे महत्त्व जनमानसात रुजवणे,हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.

रविवारी सकाळी होणाऱ्या या कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम आणि हास्य योगाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.तरी,आरोग्याचा हा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी आबालवृद्धांनी,महिलांनी व तरुणांनी सकाळी ७.१५ वाजता सांगोला विद्यामंदिर येथे वेळेवर उपस्थित रहावे,असे आवाहन अध्यक्ष जगताप सर व चैतन्य हास्य योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button