आरोग्य

सावे येथे मोफत आरोग्य तपासणी,औषध वितरण व फराळ वाटप कार्यक्रम संपन्न

सांगोला :

सांगोला तालुक्यातील सावे ग्रामपंचायत,रोटरी क्लब व दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला श्रावणी सोमवार निमित्त सोमवारी १७ ऑगस्ट रोजी सावळेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या महादेव मंदिर,सावे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी,शस्त्रक्रिया शिबीर,मोफत औषध वितरण व फराळ वाटप कार्यक्रम हा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

शिबिराच्या उदघाटनसमयी रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष माणिकराव भोसले, डॉ.शिवराज भोसले,डॉ. निरंजन केदार,सावे गावचे सरपंच शिवाजी वाघमोडे, माजी सरपंच संभाजी देवकते,सावळेश्वर मंदिर ट्रस्टचे पोपट बंडगर,संजय सरगर,भारत शेजाळ,संजय गडदे तसेच दक्षता हॉस्पिटलच्या वतीने डॉ.वृषाली होनमाने,डॉ. विश्वजीत घोंगडे,डॉ.किरण सरगर,दक्षता हॉस्पिटल मधील सर्व नर्सिंग स्टाफ व कर्मचारी तसेच धनराज ॲम्बुलन्सचे सचिन चांदणे आदी मान्यवर तसेच सावे गावातील सर्व ज्येष्ठ नेते व युवा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर शिबिरात विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तसेच मुतखडा व मूत्ररोगाच्या रुग्णांची तपासणी करुन आवश्यक त्या शस्त्रक्रिया उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसंदर्भातही सल्ला देण्यात आला.या आरोग्यसेवा उपक्रमाला सावे पंचक्रोशीतील व परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबिरामध्ये एकूण २२१ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सदरच्या शिबिराचा लाभ घेत आयोजकांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button