डॉक्टर्स डे निमित्त सांगोला येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा

सांगोला डॉक्टर्स असोसिएशन व सूर्योदय परिवाराचा स्तुत्य उपक्रम

सांगोला :

           माणसाची सहनशक्ती व कणखरपणा वाढवणारा, अमूल्य अशा वेळेचे भान राखत वक्तशीरपणा व सातत्य शिकवणारा तसेच चिंता व तणाव मुक्त होऊन अंगी स्वयंशिस्त निर्माण करणारा जागतिक कीर्तीचा लोकप्रिय क्रीडा प्रकार म्हणून गौरवण्यात आलेल्या मॅरेथॉनला प्राधान्य देत डॉक्टर्स डे निमित्त सांगोला डॉक्टर्स असोसिएशन व सूर्योदय परिवाराच्या संयुक्त विद्यमाने येत्या 1 जुलै रोजी सांगोला येथे भव्य “सांगोला मॅरेथॉन- 2026” चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू व क्रीडा रसिकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अंकित गर्ग यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून समर्पण,विश्वास,सेवा आणि एकता ही चतुसूत्री मनामध्ये बाळगून व धन्वंतरी देवतेचे सतत स्मरण ठेवत विविध प्रकारच्या रुग्णांच्या जीवनात चैतन्य निर्माण करत पवित्र वैद्यकीय पेशा जपणारी सांगोला डॉक्टर्स असोसिएशन आणि हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करुन देत असंख्य कुटुंबांसाठी आधारवड होऊन सहकार,उद्योग, चळवळ व सामाजिक बांधिलकी व्यापक स्वरुपात जपत समाजातील प्रत्येक घटकांसाठी सातत्याने कार्य करत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी सह प्रायोजक असलेले रेवनील ब्लड बँक सांगोला,माडगूळकर ज्वेलर्स,सांगोला आणि सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांचेही मोलाचे सहकार्य आहे.

थोर स्वातंत्र सेनानी आणि पेशाने डॉक्टर असलेले पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ.बी.सी.रॉय यांची जयंती व पुण्यतिथी असलेला 1 जुलै हा दिवस देवाचे दुसरे रुप असलेल्या देशातील समस्त डॉक्टरांच्या अतुलनीय सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून भारत सरकारकडून 1991 पासून राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’ घोषित करण्यात आला.या दिवशी सर्वत्र विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येतो.मात्र,सांगोला डॉक्टर्स असोसिएशनने आरोग्यासाठी उपयुक्त अशा मॅरेथॉन सारख्या स्पर्धेचे आयोजन करुन एक वेगळा आदर्श समाजासमोर उभा केलेला आहे.

दरवर्षी या दिवशी प्रत्येक डॉक्टरांच्या दालनात जाऊन त्यांच्या सेवेचा सन्मान करण्याची सूर्योदय परिवाराची अनेक वर्षांची परंपरा असून क्रिकेट रसिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सूर्योदय चषकच्या’ यशस्वी स्पर्धेनंतर ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सांगोला मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात सूर्योदय परिवाराने हिरिरीने घेतलेला सहभाग देखील कौतुकास्पद आहे.या मॅरेथॉन स्पर्धा बुधवार दि.1 जुलै रोजी सकाळी 6 वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मैदान ते माण नदी या दरम्यान संपन्न होणार आहेत.या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी अवघी 300/- रुपये इतकी नाममात्र रजिस्ट्रेशन फी असून यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा. तसेच सांगोला शहर व परिसरातील क्रीडा रसिकांनी ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
                    ==========================

विवीध स्पर्धा व बक्षीसांची रेलचेल :

10 किलोमीटर खुला गट, 5 किलोमीटर पुरुष गट आणि 5 किलोमीटर महिला गट अशा त्रिस्तरीय मॅरेथॉन शर्यती संपन्न होणार असून प्रत्येक गटातून पहिली तीन बक्षिसे पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

*    10 किलोमीटर खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेसाठी पहिले 21 हजार रुपयांचे बक्षीस डॉ.निकिता बाबासाहेब देशमुख यांच्या अमूल्या फिटल मेडिसिन सेंटर,पंढरपूर यांचेकडून देण्यात येणार आहे.याच गटातील द्वितीय क्रमांकाचे 15 हजार रुपयांचे बक्षीस डॉ.संतोष पिसे यांच्या पिसे डायग्नोस्टिक सेंटर सांगोला यांचे कडून देण्यात येणार आहे.तर,तृतीय क्रमांकाचे 11 हजार रुपयांचे बक्षीस हे
डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांच्या आनंद हॉस्पिटल,सांगोला यांचेकडून देण्यात येणार आहे.

*    5 किलोमीटर महिला गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे पहिले 10 हजार रुपयांचे बक्षीस डॉ.विजय बंडगर यांच्या यशोदा हॉस्पिटल यांचेकडून देण्यात येणार आहे. याच गटातील द्वितीय क्रमांकाचे 7 हजार 500 रुपयांचे बक्षीस नूतन पंचायत समिती सदस्य डॉ.आबासाहेब दबडे यांचे कडून देण्यात येणार आहे.तर,तृतीय क्रमांकाचे 5 हजार रुपयांचे बक्षीस कै.योगिनी सोनलकर यांचे स्मरणार्थ अमृतयोग हॉस्पिटल यांचेकडून देण्यात येणार आहे.

*     त्याचबरोबर,5 किलोमीटर पुरुष गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे पहिले 10 हजार रुपयांचे बक्षीस डॉ.धनंजय गावडे यांच्या सदगुरु हॉस्पिटल व ट्रॉमा केअर सेंटर यांचेकडून देण्यात येणार आहे. याच गटातील द्वितीय क्रमांकाचे 7 हजार 500 रुपयांचे बक्षीस डॉ.राहुल भागवत माने यांच्या अक्सिस डायग्नोस्टिक सेंटर यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर,तृतीय क्रमांकाचे 5 हजार रुपयांचे बक्षीस डॉ.अजय सुनीलदत्त कोरे यांच्या कोरे मेडिकलच्या वतीने देण्यात येणार आहे.
==========================

विवीध संस्था व व्यक्तींचेही विशेष योगदान :

*               सांगोला मॅरेथॉन 2026 स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता हॉटेल जयनीला,चंद्रभागा नेत्रालय,कृषिरत्न महिला अर्बन,हॉटेल संगम,समृद्धी अर्बन बँक,आधार क्लिनिक जवळा,हॉटेल श्रीराम,माजी सरपंच अरुण भिमराव केदार,वासुद,आनंद लॉन्स,शिवश्री वैभव केदार,हॉटेल जाधव (कडलास नाका), विठ्ठल स्टील ट्रेडर्स,सांगोला,सांगोला स्कॅन सेंटर,मोरया स्टील अँड फर्निचर,श्रीमंत मेन्स वेअर,श्रीराम नवमी यात्रा समिती,वासूद,दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे मित्रपरिवार,महेश फ्रुट कंपनी,सांगोला इत्यादींनी देखील आपले मोलाचे योगदान दिलेले आहे.

*             या मॅरेथॉन स्पर्धेकरिता सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी,सांगोला यांचे वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामधून देखील प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे 5 हजार रुपये,3 हजार रुपये व 2 हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.
==========================