सामाजिक

स्व.छबूताई गायकवाड यांच्या रक्षा विसर्जनादिवशी वृक्षारोपण करुन अस्थिचे विसर्जन

सांगोला :

सांगोला तालुक्यातील कडलास येथे छबूताई मधूकर गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमादिवशी मायेची सावली कायम रहावी,यासाठी नातेवाईकांनी वृक्षारोपण करुन समाजासमोर आदर्श ठेवत श्रध्दांजली अर्पण केली.

सांगोला तालुक्यातील कडलास येथे छबूताई मधूकर गायकवाड यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले होते.त्यानंतर रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमा दिवशी स्व.छबूताई गायकवाड यांच्या मायेची सावली कायम रहावी म्हणून,त्यांच्या कन्या सौ.सुप्रिया आप्पासाहेब पाटील (रा.शिगांव),सौ.शैलजा अमरसिंह जाधव (रा.सुलतानगादी) व सौ.ललिता तानाजीराव गायकवाड (रा.सिकंदर टाकळी) यांच्यासह भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड व इतर नातेवाईकांनी वृक्षारोपण करुन अस्थिचे विर्सजन केले तसेच सर्व नातेवाईकांच्यावतीने श्रध्दांजली वाहिली.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button