भीमनगर प्राथ.शाळेत छ.शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

सांगोला :

लोक कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांची 152 वी जयंती सांगोला शहरातील भीमनगर जि.प.प्राथमिक शाळेत नुकतीच मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ.शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यासमयी बहुजनांचे नेते आयु.बापूसाहेब ठोकळे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन,पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.यावेळी बापूसाहेब ठोकळे यांना शिक्षक, विद्यार्थी,प्रतिष्ठित नागरिक,अंगणवाडी सेविका,मदतनीस व पालक या सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी आयु.बापूसाहेब ठोकळे आयु.अरुणभाऊ केदार,प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, आयु.बाबासाहेब बनसोडे,आयु.शहाजी गडहिरे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शेळके मॅडम यांनी केली.यावेळी सांगोला नगरपरिषदेच्या नगरसेविका आयु.गोदाबाई बनसोडे,ऍड.आनंदा बनसोडे,आयु.के.डी. बनसोडे,आयु.वैभव भोरकडे,आयु.प्रवीण सूर्यगंध, आयु.जयंती बनसोडे, आयु.लक्ष्मीबाई बनसोडे, आयु.प्रियांका बनसोडे व पालक उपस्थित होते.शेवटी, शिक्षिका आयु.मैना गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
===================================