क्राईम

बार्शी जिल्हा न्यायालयाने दिला पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला जामीन

ऍड.एस.व्ही.इनामदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य

 

बार्शी/प्रतिनिधी :

पोक्सो कायद्यान्वये करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीच्या बाजूने ऍड.एस.व्ही. इनामदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की,यातील आरोपी रखमा गोरे याने एका अल्पवयीन मुलीशी सोशियल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.त्यानंतर,गैरहेतूने त्याचे स्क्रिनशॉट व व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने ते सोशियल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे,रखमा गोरे याचेविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी रखमा गोरे याचे वतीने ऍड.एस.व्ही.इनामदार यांनी बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाच्या सुनावणीवेळी ऍड.एस.व्ही. इनामदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.यु.एल.जोशी यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला असल्याची माहिती आरोपीचे वकील ऍड.एस.व्ही.इनामदार यांनी दिली.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button