चोरीला गेलेले तब्बल ३६ लाखांचे १४५ मोबाईल सांगोला पोलीसांनी दिले शोधून

सांगोला :
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत दि.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत गहाळ झालेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी सुमारे ३६ लाख २५ हजार रुपये किंमतीचे तब्बल १४५ मोबाईल हे पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोधून सांगोला पोलीसांनी संबंधित तक्रारदारांना नुकतेच परत केल्याने मोबाईलधारक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत चालल्याने मोबाईलधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.विशेषत: आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरीचे प्रकार सर्रास चालू होते.या बाबीची दखल घेवून पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे यांनी सायबर पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेवून सुमारे ३६ लाख २५ हजार रुपये किंमतीचे तब्बल १४५ मोबाईल हस्तगत केले.
तसेच दि.१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या महिनाभराच्या कालावधीत गहाळ झालेल्या एकूण २५ मोबाईलचा शोध घेतला असता,सुमारे ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे १६ मोबाईल यांचा शोध घेऊन तक्रारदारास परत केले आहे.
—————————————————————————
कामगिरीचे मानकरी :
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पो.नि.भीमराय खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.शहाजहान शेख व पो.कॉ.रतन जाधव (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली आहे.