सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली नाम.शिवेंद्रराजे भोसले‌ यांची भेट

 

सांगोला :

सांगोला तालुक्यातील प्रलंबीत विकासकामांबाबत चर्चा करण्याच्या उद्देशाने सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री नाम.शिवेंद्रराजे भोसले‌ यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

सांगोला विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नाम.शिवेंद्रराजे भोसले‌ यांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान करत विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि स्व.भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या जुन्या आठवणींना उजाळाही दिला.

या भेटीनंतर बोलताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की,नाम.शिवेंद्रराजे भोसले‌ यांना भेटल्यानंतर खूप आनंद झाला.स्व.भाई आबासाहेबांबद्दल त्यांची नेहमीच आपुलकीची भावना राहिली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्याबरोबर राहतील.या भेटी दरम्यान,त्यांनी सांगोला तालुक्यातील अनेक प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली.त्यासाठी ना.शिवेंद्रराजे भोसले‌ यांचेकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला असल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
—————————————————————————

सांगोल्यातील कामांसाठी माझी नेहमीच मदत राहील :

सांगोला तालुक्यातील प्रलंबीत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी या नात्याने जातीने लक्ष घालणार आहे.यापुढील काळात सांगोला विधानसभा मतदारसंघातील कामांसाठी माझी नेहमीच मदत राहील.
– नाम.शिवेंद्रराजे भोसले‌ (सार्वजनीक बांधकाम मंत्री)