“शोलापूरी मशाल न्यूज” च्या माध्यमातून एक नवी झेप !
दीनदलित,दुबळे व गोरगरीब जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून,त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने सुमारे ३० वर्षापूर्वी सुरुवातीला “साप्ताहिक मशाल” व नंतर “साप्ताहिक सांगोला वार्ता” या वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना मिळालेल्या अनुभवाची शिदोरी पुढे विवीध दैनिकांमधून काम करताना खूपच उपयोगी पडली.
परंतु, सध्याचे जग हे सोशल मिडीया व डिजीटल मिडीयाचे जग असल्याने काळानुसार आपल्यातही बदल करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे काळाची गरज पाहून प्रिंट मिडीयाच्या जोखडातून बाहेर पडून आता नव्या उमेदीने डिजीटल मिडीयामध्ये पदार्पण करण्याच्या उद्देशाने आम्ही “शोलापूरी मशाल न्यूज” या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून एक नवी झेप घेत आहोत.
वृत्तपत्र क्षेत्रात काम करत असताना मागील तीस वर्षाच्या काळात अनेक चांगलेवाईट अनुभव आले. परंतु, त्यातूनही सगळ्यात महत्वाचे म्हणजे जनतेचा,वाचकांचा व हितचिंतकांचा जो एक आधार मिळाला,जे प्रेम मिळाले, ते कधीही न विसरण्यासारखे आहे. आम्ही केलेल्या लिखाणावर व प्रत्येक बातमीवर भरभरुन प्रतिसाद देवून जे आमचे मनोधैर्य वाढवले, ते आमच्या पत्रकारितेतील यशाला बळ मिळवून देणारे ठरले.
आजपर्यंत आमच्या पत्रकारितेवर ठेवलेल्या विश्वासाला तडा जावू न देता, यापुढेही एक समाजसेवेचे व्रत म्हणून आम्ही
“शोलापूरी मशाल न्यूज” या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून वस्तूस्थिती दर्शविणारे नेहमीप्रमाणे सडेतोड लिखाण करत आपल्या परिसरातील घडणार्या विवीध घडामोडींना आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम डिजीटल मिडीयाद्वारे करणार असून आमच्या या नव्या प्रयत्नालाही आपणा सर्वांचे सहकार्य व प्रेम निश्चीतच मिळेल, याची आम्हाला पूरेपूर खात्री आहे.
– आपलाच पत्रकार हमीद इनामदार.
We are waiting from long time.
Please start earlier
In Fayazbhai Style
Very good job
अभिनंदन – मनापासून धन्यवाद