मुंबई परिसरात सांगोलकरांना हक्काचे घर,सांगोला भवन व हक्काचे कार्यालय देणार – दीपकआबा साळुंखे-पाटील
मुंबईत “न भूतो,न भविष्यती” असा स्नेह मेळावा संपन्न
सांगोला :
पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्या सांगोलकरांना मुंबई व परिसरात सुमारे १०० एकरावर घरकुल योजना राबवून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या अडीअडचणी व व्यथा मांडण्यासाठी २४ तास तत्पर असणारे कार्यालय आणि सांगोला तालुक्यातील विद्यार्थी,तरुण तसेच अन्य नागरिकांसाठी नवी मुंबई परिसरात भव्य "सांगोला भवन" उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिले.
वाशी येथील सिडको एक्झीबिशन अँड कॉन्वेंशन हॉल येथे माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांचा भव्य दिव्य आणि अभूतपूर्व असा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला.या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजाराहून अधिक नागरिक उपस्थित होते.आजवरच्या इतिहासात मुंबई परिसरात झालेला हा सर्वात भव्यदिव्य स्नेह मेळावा होता. दरम्यान या स्नेह मेळाव्यात मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या हजारो सांगोलकर कुटुंबीयांनी सहकुटुंब सामील होत दीपकआबा साळुंखे-पाटील यांचेशी दिलखुलास संवाद साधला.या स्नेह मेळाव्यातील उपस्थित नागरिकांचा उत्साह एखाद्या उत्सवाप्रमाणे दिसत होता. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या स्नेह मेळाव्याची मुंबईसह संपूर्ण सांगोला तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबई,नवी मुंबई,ठाणे,रायगड,अलिबाग,पनवेल,पालघर तसेच मुंबई परिसरातील सर्व सांगोलकर बांधवांना संबोधित करताना यावेळी दीपकआबा म्हणाले की,मुंबईत सांगोलकर बांधवांनी केलेल्या भव्य दिव्य स्वागतामुळे मी अक्षरशः कृतार्थ झालो आहे.आजवर केलेल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष कामाची ही पोहोच पावतीच आहे असे मी मानतो.मुंबईतील बांधवांनी केलेल्या सत्कारामुळे यापुढील काळातही आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली.गेली ३० ते ३५ वर्ष राजकीय व सामाजिक आयुष्यात सक्रिय असताना माणुसकी हाच आपला धर्म आणि निस्वार्थ कर्तव्य हीच आपली जात या भावनेने काम करत आलो आहे.समोर येणारा व्यक्ती कोणत्या,पक्षाचा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा आहे,याचा कधीच विचार न करता येणाऱ्या नागरिकांचे काम मार्गी लावणे हे आपले कर्तव्य आहे,या भावनेतून कसलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक व्यक्तीचे काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला.यापुढील काळातही याच विचारावर आपण काम करु आणि मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू,अशी ग्वाहीही शेवटी दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी यावेळी बोलताना सांगोलकरांना दिली.
———————————————————————————————————
विधानसभेचा सदस्य म्हणून धनगरी वेशात शपथ घेणार :
संपूर्ण सांगोला तालुक्यासह आता मुंबईस्थित सांगोलकरांनीही यंदाच्या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत दीपकआबा साळुंखे-पाटील यांनाच आमदार करण्याचा निर्धार केला असून आमदार म्हणून निवड झाल्यानंतर दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी विधानसभेचा सदस्य म्हणून धनगरी वेशात शपथ घ्यावी, अशी विनंती धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोटे यांनी यासमयी केली.यावर दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी तात्काळ होकार दर्शवून वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या मागण्यांवर आवाज उठवणार असल्याचा शब्द दिला.
———————————————————————————————————
मुंबईत राजकीय भूकंप पण,हादरे मात्र सांगोल्यात :
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील स्नेह मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक ७ ते ८ हजार सांगोलकर बांधवांनी उपस्थिती लावल्याने या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे.दीपकआबांच्या सांगोला तालुक्यात सुरु असलेला गावभेट दौरा,महिला मेळावा तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळत असतानाच मुंबई येथील स्नेह मेळावाही सुपरहिट झाल्याने इतर राजकीय पक्षांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.त्यामुळे, मुंबईत राजकीय भूकंप पण,हादरे मात्र सांगोल्यात,अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागल्या आहेत.
———————————————————————————————————