दिव्यांग बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडवून दिव्यांग भवनाचा प्रश्नही मार्गी लावणार – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांची बैठक संपन्न
सांगोला :
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने विविध मागण्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर
बुधवारी धरणे आंदोलन केल्यानंतर सदर आंदोलनाची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवारी ३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय,सांगोला नगरपरिषद,पंचायत समिती व पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी व दिव्यांग बांधव यांची संयुक्त बैठक बोलावून दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याबाबत सूचना दिल्या.तसेच दिव्यांग भवनाचा प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे सांगून त्यासाठी लागणारा निधी अजिबात कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी या बैठकीत दिली.
यावेळी,दिव्यांग बांधवांना स्वतंत्र शिधापत्रिका, ग्रामपंचायतींनी ५ टक्के निधी खर्च करावा आणि इतर मागण्यांबाबत प्रहार दिव्यांग क्रांतीचे तालुका अध्यक्ष सतीश दिडवाघ यांनी माहिती दिली. त्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिव्यांग बांधवांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्या प्राधान्याने सोडवाव्यात,अशा सूचना दिल्या.
सदर बैठकीस तहसीलदार संतोष कणसे,पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे,सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी,गटविकास अधिकारी कुलकर्णी,निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे,पंचायत समितीचे फुले यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नविद पठाण,दादा खडतरे,बापू इंगोले यांच्यासह शिवसेना विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख,उद्योगपती आनंद घोंगडे, मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष दीपक ऐवळे, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे,संतोष खडतरे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची दखल घेतल्याने आ.शहाजीबापू पाटील यांचे दिव्यांग बांधवांनी आभार मानले.
—————————————————————————