सांगोला :
२०१९ मध्ये आमदार झाल्यापासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करुन ती मार्गी लावली.कार्यतत्पर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करुन त्या कार्यान्वित केल्या.आमदारकीच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी कधीही दुष्काळाची जाणीव होवू दिली नाही.त्यामुळे, आमदार शहाजीबापू पाटील यांना तालुक्यासह राज्यात “पाणीदार आमदार” म्हणून ओळखले जाते.याच संकल्पनेतून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “पाणीदार आमदार” या कार्य अहवालाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मुंबई येथे ‘वर्षा’ या निवासस्थानी आमदार शहाजीबापू पाटील,उद्योगपती प्रवीण चौगुले व युवा नेते ओंकार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
सन २०१९ ते २०२४ या ५ वर्षांच्या कार्यकाळात आम.शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल ५ हजार कोटीहून अधिक विकास निधी खेचून आणला. या विकास निधीतून ५ वर्षात केलेल्या शेती सिंचनाच्या विविध योजनांमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना,टेंभू उपसा सिचन योजना,म्हैसाळ उपसा सिंचन योजना,नीरा उजवा कालव्याची वाढीव कामे यासह विस्तारित शिरभावी पाणीपुरवठा योजना व ग्रामीण भागासाठी जलजीवन मिशन योजना मार्गी लावल्या.तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे, जलसंधारणाची कामे,नगरपालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे,आरोग्य विषयक कामे करुन तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार शहाजीबापू यांनी साधला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “पाणीदार आमदार” या कार्य अहवालाचे प्रकाशन करुन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विकास कामांची प्रशंसा केली. या कार्य अहवालात तालुक्यातील विकास कामांचा संपूर्ण आढावा व गोषवारा फोटोसह पुस्तक रुपात तयार करण्यात आला आहे.
——————————————————————
गांवनिहाय कार्यपुस्तिका उपलब्ध करुन दिली जाणार :
आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागील ५ वर्षात केलेल्या कार्याची माहिती मतदारसंघातील सर्व नागरिकांना देण्याकरिता “पाणीदार आमदार” कार्य अहवाल पुस्तिका तयार करण्यात आली आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण गावनिहाय केलेल्या कामांचा तपशील या कार्य अहवालात समाविष्ट असून लवकरच नागरिकांना गावनिहाय कार्यपुस्तिका उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
– माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ (पुस्तिकेचे प्रकाशक)
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक