सांगोल्यातील ब्राह्मण,जैन,महाराणा प्रताप राजपूत घिसाडी समाज व दिव्यांग बांधवांच्या सभागृहासाठी प्रत्येकी ५० लाखांचा निधी मंजूर
सांगोला :
सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला नगरपरिषदेच्या ५ विकास कामांसाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये सांगोला नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व इतर अंतर्गत कामासाठी १ कोटी रुपये तसेच तालुक्यातील ब्राह्मण,जैन,महाराणा प्रताप राजपूत घिसाडी समाज व दिव्यांग बांधवांकरिता सभागृह बांधकामासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामाकरिता १ कोटी रुपये,जैन समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये त्यागी निवास व समाज मंदिर बांधकामासाठी ५० लाख रुपये,दिव्यांग बांधवांसाठी नगरपालिका जागेमध्ये सभागृह बांधकामासाठी ५० लाख रुपये,ब्राम्हण समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये वाचनालय व सभागृह बांधकामासाठी ५० लाख रुपये, महाराणाप्रताप राजपूत घिसाडी समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये समाजमंदिर बांधकामासाठी ५० लाख रुपये असा एकूण ३ कोटी रुपयेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याने समाज बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारचे त्याचबरोबर आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत.
——————————————————————