आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव

सांगोला :

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानला गुंफण अकादमी कराड,यांच्या “गुंफण सामाजिक पुरस्काराने” मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने साहित्य, सामाजिक,सांस्कृतिक,सहकार, उद्योग,शिक्षण आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांचे वितरण पुणे येथे संपन्न झालेल्या २१ व्या गुंफण सदभावना साहित्य संमेलनात नुकतेच करण्यात आले.संमेलनाध्यक्ष गझलकार सुनंदा शेळके,भारती विद्यापीठचे सहकार्यवाह डॉ.महादेव सगरे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय बोरुडे,जेष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार,जयसिंग कळके,गुंफण अकादमीचे अध्यक्ष बसवेश्वर चेणगे,पत्रकार गजानन चेणगे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व बुके देऊन आपुलकी सदस्यांना गौरविण्यात आले.

       यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव,सचिव संतोष महिमकर,प्रभाकर सरगर,अच्युत फुले,महादेव दिवटे,सुरेश काका चौगुले,अरविंद डोंबे,प्रा.बाळासाहेब शेंडे,विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे,विश्वासराव पाटील, दत्तात्रय नवले,श्रीकांतकाका देशपांडे,वसंत सुपेकर,प्रथमेश यादव,जितेंद्र बोत्रे,श्रीयश नवले आदी उपस्थित होते.
===================================