महत्वाच्या बातम्या

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर,प्रदेश महासचिवपदी विकास भोसले

कोल्हापूर/प्रतिनिधी :

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणी समितीच्या कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सांगोल्याचे सतीशभाऊ सावंत यांची निवड करण्यात आली.

कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत,राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले यांची तर,प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इकबाल शेख यांची,केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कुगावकर व अमोल पाटील यांची तर,राष्ट्रीय सचिव पदी तेजस राऊत,संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम,गोवा प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील तर,मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या.

यावेळी,प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे,संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील,पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे,राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे,राज्य समन्वयक गणेश बोतालजी,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे,सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे,सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्यभरातून अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
                         ========================

पत्रकारांचे संघटन बळकट करु :

संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पत्रकारांना न्याय देऊन,त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. त्याचबरोबर,पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न, टोळमाफीचा प्रश्न यासह अन्य प्रश्नावर वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु.  माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे,त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात,प्रत्येक तालुक्यात व प्रत्येक गावात पत्रकारांचे संघटन बळकट करु.
– नुतन प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत
========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button