महत्वाच्या बातम्या

कल्याणकारी मंडळ त्वरित कार्यान्वित करण्याची वृत्तपत्र विक्रेत्यांची मागणी

सरकारला जागे करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांचा संपूर्ण राज्यात उठाव

 

सांगोला :

ऊन,वारा,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता जनतेपर्यंत दररोज वृत्तपत्रासह ज्ञान व माहिती पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते प्रामाणिकपणे करत असतात तसेच कोरोना काळातही वृत्तपत्र विक्रेत्याचे योगदान मोठे असले तरी, वृत्तपत्र विक्रेत्याकडे शासनाने अद्याप दुर्लक्षच केले असून सध्या विक्रेत्याच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.ऑक्टोबर 2024 मध्ये राज्य सरकारने कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली,परंतु प्रत्यक्ष कांहीच कारवाई नाही.त्यामुळे शासनाने कल्याणकारी महामंडळाची त्वरित अंमलबजावणी करावी,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नावाने तयार केलेले निवेदन सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सांगोल्याचे नि.नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांच्याकडे देण्यात आले.

वृत्तपत्र विक्रेत्याचा कल्याणकारी महामंडळाचा प्रश्न महत्त्वाचा असून शासनाने याकडे दुर्लक्ष करु नये तसेच विक्रेत्याच्या संयमाची वाट न पाहता,त्यांना न्याय देऊन त्वरित कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करावी,असे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी ‘वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो’, ‘कल्याणकारी महामंडळाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

याप्रसंगी,संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तम चौगुले,सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे,सदस्य रवींद्र बोत्रे,भानुदास जाधव, जितेंद्र सावंत,रेवणसिद्ध नकाते,रफिक पठाण, सिताराम गेजगे,विकास बोत्रे, संतोष सोनार इ.उपस्थित होते.
===========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button