सामाजिक

शिवभक्त जिवाजी महाले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सायकली व शालेय साहित्य भेट

 

सांगोला :

शिवभक्त जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श नाभिक समाज सेवा मंडळ व आपुलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने वाढेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील १०१ विद्यार्थ्यांना
वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दूरवरुन शाळेत पायी येणाऱ्या तीन गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या.

सांगोला तालुक्यातील वाढेगाव जिल्हा परिषद शाळेत शिवभक्त जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी, जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु.अनुष्का अशोक फरकांडे हिने जिवाजी महाले यांच्या कार्याविषयी भाषण करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कलुबर्मे,उपशिक्षिका संगीता ठोकळे,उपशिक्षिका स्वाती घोंगडे,शिक्षक नवनाथ साळुंखे व हरिश्चंद्र लवटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वसमळे,माजी अध्यक्ष प्रवीण हजारे,समिती सदस्य संतोष फरकांडे,अंगणवाडी सेविका श्रीमती सुनीता लोकरे उपस्थित होते.

तसेच आदर्श नाभिक समाज सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव,शहराध्यक्ष सुशील गवळी,उपाध्यक्ष शंकर खंडागळे,खजिनदार हनुमंत काळे,सिद्धेश्वर काळे,मनोज खंडागळे,समाधान सुरवसे, नितीन भोसले,तानाजी खंडागळे सर,सोमनाथ गवळी, गौरव काळे,अनिल काळे, संतोष चव्हाण,रामदास काळे, विनायक सागावकर,संतोष जगताप,तानाजी खंडागळे, संकेत माने,सूरज काळे, अजय चव्हाण,दगडू काळे तसेच आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव,सचिव संतोष महिमकर,अरविंद डोंबे गुरुजी,चंद्रशेखर कवडे व अमर कुलकर्णी इ.उपस्थित होते.
===========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button