सामाजिक

सांगली येथील बरकत ग्रुपच्या वतीने महिलांसाठी विवीध कार्यक्रम संपन्न

सांगली/प्रतिनिधी :

जीवनात फक्त “चुल आणि मुल” यातच गुरफटून न राहता संसाराचा गाडा यशस्वीरित्या पुढे ढकलत नेण्यासाठी आपल्या पतीबरोबर आपणही कांहीतरी करावे,यासाठी धडपडणार्‍या महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने सांगली येथील बरकत ग्रुपच्या वतीने मुस्लिम समाजातील महिलांसाठी पहिल्यांदाच विवीध स्पर्धा,बक्षीस वितरण व विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सांगली येथील बरकत ग्रुपच्या वतीने मुस्लिम समाजातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमात मेहंदी व पाककला स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या.सदर कार्यक्रमाचे आयोजन बरकत ग्रुपच्या संचालिका गझाला भागोजिकोप्पा-तांबोळी यांनी केले होते.हे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बरकत ग्रुपचे लीडर्स रुकैय्या तांबोळी,रुबीना सूर्या,तरन्नुम जमादार,जस्मिन तांबोळी,हिना तांबोळी,रईसा शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी,या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.तझीन बिडीवाले मॅडम यांनी महिलांना सक्षमीकरणाचे पाठ दिले.तसेच मोहसीना मोमीन (कोल्हापूर) व साहिरा नागवदारीया (मुंबई) यांनी मेहंदी व पाककला स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.या कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ञ डॉ.लुबना मुजावर-तांबोळी, होमिओपॅथी डॉ.तबस्सुम तांबोळी,तैय्यबा कारीगर-मुलाणी (सोशालॉजी-पीएचडी,शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर),लेखिका व फोनिक शिक्षिका सना महात, एम.ए.-कौन्सेलिंग प्सायकाॅलाॅजिस्ट शहेबाज बागवान, कॅन्सर किड्स पेशंट सेविका राहीन अत्तार,प्रा. साजिदा तांबोळी,चील अन् फील रेस्टॉरंटच्या ओनर सिमरन दाडेल या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

यासमयी,१० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलामुलींचा सन्मान करण्यात आला.यावेळी,प्रथमच सहभागी होणाऱ्या महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या व नवउद्योजिका महिलांनी तयार केलेल्या विवीध वस्तू व पदार्थांच्या खरेदी-विक्री प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
——————————————————————————

सर्वांची मनापासून खूप खूप आभारी :

“फुल खिले है गुलशन गुलशन” या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.सर्व मुस्लिम भगिनींसाठी ही पहिलीच सहभागी होण्याची संधी होती.त्यामुळे,सर्वांचे प्रेम, सहयोग आणि भरभरुन आशीर्वाद मिळाले.कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी आमच्या बरकत ग्रुप सोबत लहान मोठ्यांची खूप सारी प्रार्थना होती. ज्यांनी,ज्यांनी मला मदत केली,साथ दिली,आपुलकी दिली त्यांना मनापासून सलाम आणि मी सर्वांची मनापासून खूप खूप आभारी आहे. “Thankyou once again”.

– गझाला भागोजिकोप्पा-तांबोळी (संचालिका-बरकत ग्रुप)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button