शैक्षणिक

राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञाशोध परीक्षेतील यशाबद्दल अजनाळेच्या अभिनव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

सांगोला :

राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञाशोध परीक्षेत सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे विवीध सामाजिक संस्थांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.

अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळे येथील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत स्कूलची मान अभिमानाने उंचावली. कु.हर्षिता संदीप कोळवले (इ.२ री) हिने या परीक्षेत २०० पैकी १५६ गुण मिळवत केंद्रात ३ रा,जिल्ह्यात १४ वा व राज्यात २१ वा क्रमांक पटकावला तसेच कु.सलोनी बापुराव कोळवले (इ.५ वी) हिने ३०० पैकी २५६ गुण मिळवत ती केंद्रात पहिली,जिल्ह्यात १० वी व राज्यात १७ वी येण्याचा मान पटकावला.या घवघवीत यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींना पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी पॉलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य डॉ.रणजितसिंह देशमुख,भाई गणपतराव देशमुख शे.सह.सुतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी,रोटरी क्लबचे सचिव विजय म्हेत्रे, सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी,रविकांत मराळ,नवोदित साहित्यिक बापूसो भंडगे,पी.एस.आय.स्नेहल चव्हाण,लेखिका वंदना पाटणे,समाधान केदार आदी मान्यवर उपस्थित होते.                                       

                अभिनव पब्लिक स्कूलच्या या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर,मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम, शिक्षकवृंद व पालक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button