सांगोला :
सांगोला येथील प्रा.राजेंद्र ठोंबरे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी करत असलेल्या कार्याची दखल घेवून ठाणे येथील अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या समितीने त्यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर केला असून शुक्रवार दि.३ ऑक्टोबर रोजी ठाणे येथे मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल आणि ग्रंथ भेट देवून समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रा.राजेंद्र ठोंबरे हे ग्रामीण भागातील समाज जीवनात समरस झालेले व्यक्तिमत्व असून ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहमेळावे,स्नेहभोजने,लहान मोठ्या सहली, वाढदिवस,एकसष्ठी,पंचाहत्तरी,सहस्त्र चंद्रदर्शन साजरे करणे,वनभोजन,हुरडा पार्टी,अशा एक ना अनेक कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करत आहेत व त्यांच्या उतारवयात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य करत आहेत.शिवाय वृत्तपत्र लेखनाच्या माध्यमातून ते समाज जीवनाशी जोडले गेले आहेत.सांगोला रोटरी क्लब,चैतन्य हास्य क्लब अशा माध्यमातून ते सामाजिक व आरोग्य जागृतीचे काम करत आहेत. त्यांच्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी करत असलेल्या कार्याची दखल अनेक सेवाभावी व सामाजिक कार्य करणार्या संस्थांनी घेतली आहे.
—————————————————————
विविध पुरस्कारांनी सन्मानित :
ज्येष्ठ नागरिकांसाठी घेत असलेल्या विविध उपक्रमाबद्द्ल प्रा.ठोंबरे यांना आतापर्यंत स्टार ऑफ द गेट टुगेदर, द नॅशनल एक्सलन्स अॅवार्ड,जीवन गौरव,महाराष्ट्र आयकॉन आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली