महत्वाच्या बातम्या

गार्डी ते मोरेवस्ती रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी नाम.जयकुमार गोरे यांनी मंजूर केला साडेपाच कोटींचा निधी

माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाला यश

सांगोला :

सांगोला विधानसभा मतदार संघांतील व पंढरपूर तालुक्यातील गार्डी ते मोरेवस्ती या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आशियाई विकास बँकेमार्फत तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांनी जानेवारी २०२४ मध्ये निधीची मागणी करत त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.जयकुमार गोरे यांनी या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामास ५ कोटी ७० लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील (सांगोला विधानसभा मतदार संघांतील) गार्डी ते मोरेवस्ती या रस्त्यावर साखळी क्रमांक ३५० येथे १०८ मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागील वर्षी ग्रामविकास खात्याकडे मागणी केली होती.या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.जयकुमार गोरे यांनी नुकतीच मंजुरी दिली असून या कामास ५ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी सांगीतले.

माजी आम.शहाजीबापू पाटील यांनी या कामाबरोबरच इतर कामांचीही मागणी केली होती.त्यापैकी,गार्डी ते मोरेवस्ती रोडवरील पुलाच्या कामास मंजुरी मिळाली आहे.सदर काम ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित गार्डी ते मोरेवस्ती पुलाचे काम मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे गार्डी गावच्या ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button