शैक्षणिक

नियमांचे पालन करणे हाच देशाचा आदर करण्याचा सर्वात सोपा मार्ग – पो.उपनिरीक्षक भारत वाघे

सांगोला :

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्तांनी केलेला त्याग व दिलेले बलिदान यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून आज आपला देश विविध क्षेत्रात आघाडीवर आहे.अशावेळी नियमांचे पालन करणे हाच देशाचा आदर करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे,असे विचार पोलीस उपनिरीक्षक भारत वाघे यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्यातील महूद अंतर्गत असलेल्या खांडेकरवस्ती (नवी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमात श्री.वाघे हे बोलत होते.या शाळेचे माजी विद्यार्थी आणि सैन्य दलात कार्यरत असणारे शुभम खांडेकर यांच्या हस्ते यावेळी ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बबन खांडेकर हे होते.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस उपनिरीक्षक भारत वाघे पुढे म्हणाले की,​देशाच्या सीमांवर सैनिक रक्षण करतात तर,देशाच्या आत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करतात.​शिस्त हीच खऱ्या स्वातंत्र्याची पायाभरणी आहे. चुकीच्या संगतीपासून दूर रहा व देशाचे एक जबाबदार नागरिक बना,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर संगीतमय कवायत केली.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेत घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे व मेहंदी रेखाटन स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य उमेश पाटील, पोलीस पाटील प्रभाकर कांबळे,सामाजिक कार्यकर्ते दीपक धोकटे,महेंद्र खांडेकर,विक्रम मस्के,मुख्याध्यापक उमेश महाजन,पल्लवी मेणकर,अंगणवाडी सेविका जनाबाई दोलतोडे,मयुरा महादेवकर यांच्यासह ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button