कमलापूर ग्रामपंचायत व सांगोला लायन्स क्लबच्या वतीने नेत्र शिबीर संपन्न
सांगोला :
स्वर्गीय आमदार डॉ.गणपतराव देशमुख यांच्या ९८ व्या जयंती निमित्त ग्रामपंचायत,कमलापूर व लायन्स क्लब, सांगोला तसेच श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल,सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कमलापूर येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर पार पडले.या शिबीरामध्ये सुमारे २१० रुग्णांची तपासणी करुन १४ रुग्ण हे सांगली लायन्स हॉस्पिटल येथे ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आले.
प्रारंभी,स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.यावेळी, विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख लायन्स क्लबच्या कार्याचा गौरव करत म्हणाले की,स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुक्यातील गोरगरीब व कष्टकरी जनतेला नेहमीच आधार आणि न्याय देण्याचे काम केले.त्यांच्या जयंतीचे निमित्त साधून समाजातील गरजू लोकांसाठी विधायक काम करणे,ही आपली जबाबदारी आहे,असे ते म्हणाले.
यावेळी माजी जि.प.सदस्य संगम (आप्पा) धांडोरे,युवा नेते शशिकांत येलपले,विष्णू देशमुख,अमोल खरात, उद्योगपती ला.गिरीश नष्टे,ला.अॅड.संजीव शिंदे, उद्योगपती महादेव वाघमारे,युवा नेते बाबुराव बंडगर, माजी उपसरपंच देविदास ढोले,युवा नेते रावसाहेब अनुसे,रमेश वाघमारे,डॉ.सतीश तंडे,सरपंच रुपाली सत्यवान तंडे,लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबचे सांगोला अध्यक्ष प्रा.एन.डी.बंडगर, सचिव सूर्यकांत कांबळे,खजिनदार मंगेश म्हमाणे, डॉ.रियाज मुल्ला,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सोमनाथ अनुसे,सखाराम आदलिंगे,सुरेश केसकर,चेअरमन दिलीप बंडगर,उपसरपंच नितीन काळे,साधू गोडसे, नवनाथ पडवळे,अनिल पडवळे,ग्रामसेवक संजय खटकाळे,विजय देवकते,धर्मराज टकले,गोरख पुजारी, प्रकाश ऐवळे,इंजि.सागर अनुसे,बाळासो पांढरे, समाधान बंडगर,कुमार जाधव,संतोष शिंदे,संतोष टाकळे,अर्जुन पुजारी,ओंकार नवले,रोहित कोळेकर, सुशांत नवले,बाळकृष्ण बंडगर,सत्यवान बंडगर,लालू कांबळे,पोलीस पाटील विजय म्हेत्रे,भगवान अनुसे, भागवत अनुसे,शामराव बंडगर,दामोदर बंडगर,ईश्वर ऐवळे,दगडू ऐवळे,बाळू तोरणे,दत्तात्रय नवले,आबासो चंदनशिवे,अतुल कांबळे,रघुनाथ ऐवळे,अशोक ऐवळे, अनिल चंदनशिवे,कमलापूर ग्रामपंचायतचे सर्व सेवक, आरोग्य सेविका,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.एन.डी.बंडगर यांनी तर,आभार प्रदर्शन सोमनाथ (अण्णा) अनुसे यांनी मानले.
——————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली