स्व.आ.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंती निमित्त सांगोल्यात प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

सांगोला :

सांगोला तालुक्याचेच नव्हेतर,संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्यविधाते,राजकारणाबरोबरच समाजकारण, सहकार,शिक्षण,शेती व पाणी या क्षेत्रात भरीव कामगिरी करुन महाराष्ट्रातील लोकमाणसांवर ठसा उठवणारे,राजकारणात दंतकथा ठरलेले असे विश्वविक्रमी नेतृत्व,संपूर्ण आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षातच राहून पक्ष आणि जनतेशी इमानदारी व बांधिलकी जपून अनेक पक्षीय प्रलोभनाला बळी न पडता ध्रुवताऱ्याप्रमाणे अचल राहणारे,महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांची जाण व भान असणारे,शेतकरी कामगार पक्षाची ओळख जगभर करुन देणारे नेतृत्व,शेतकरी,शेतमजूर आणि कामगारांसाठी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी व्यतीत करणारे,सांगोला तालुक्याचे दैवत व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोलाचे संस्थापक अध्यक्ष स्व.आम.डॉ.गणपतराव देशमुख यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,सांगोलाच्या कॅम्पसमध्ये रविवारी १० ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय,सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम,सांगोला या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने स्व.आ.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी,डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर प्रतिमा पूजन व वृक्षारोपण कार्यक्रम श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख,सौ.सुरेखाताई चंद्रकांत देशमुख,संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख,डॉ.सौ.आस्था अनिकेत देशमुख, संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर,संस्था सदस्य प्रा.अशोकराव शिंदे,प्रा.दीपक खटकाळे,प्रा.जयंत जानकर व डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य प्रा.केशव माने व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य दिनेश शिंदे सर, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव,पर्यवेक्षक दशरथ जाधव सर,तातोबा इमडे सर,डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अशोक कांबळे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज,सांगोलाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.इंदिरा येडगे व स्मिता इंगोले मॅडम या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी,सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी स्व.आम.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजने मार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संस्था अध्यक्ष डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख व संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आले.या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.ज्योतिबा हुरदुके,प्रा.संतोष राजगुरु व वृक्षारोपण कमिटीचे चेअरमन प्रा.अक्षय माने तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेजचे प्रा.मिलिंद पवार,प्रा. दत्तात्रय देशमुख,प्रा.अरुण बेहेरे व प्रा.जुलेखा मुलाणी यांचे अनमोल सहकार्य लाभले.तसेच “एक पेड माँ के नाम” या मोहिमे अंतर्गत एन.सी.सी.विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.जे.व्ही.ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाडाचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले,अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा.बाळासाहेब सरगर यांनी दिली.
——————————————————————————