सांगोला :
सांगोले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी तयार केलेला व स्थायी समितीने सुचविलेल्या दुरुस्त्या व शिफारशीसह सांगोले नगरपरिषदेचा सुमारे दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प सोमवारी मंजूर करण्यात आला.

सांगोले नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये काल सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत नगरपरिषदेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या सुधारीत व सन २०२६-२७ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकाचा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी तयार केलेला व स्थायी समितीने सुचविलेल्या दुरुस्त्या व शिफारशिंचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष आनंदा माने यांच्यावतीने नगरपरिषदेचे लेखापाल हरीभाऊ काळे व लेखापरिक्षक लहु लेंगरे यांनी मांडल्यानंतर या अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली असून सदर अर्थसंकल्पामध्ये जमा बाजूस आरंभीच्या शिल्लकेसह महसुली जमा व शासन अनुदाने अशी एकुण रक्कम रु. २२९,७९,७४,५३९/- इतकी जमा दर्शविण्यात आली आहे तर,खर्चाच्या बाजूस महसुली व शासन अनुदानामधुन खर्च रक्कम रु.२२९,७८,२३,७४०/- इतकी दर्शविण्यात आली आहे आणि अखेर शिल्लक रक्कम रु. १,५०,७९९/- इतकी दर्शविणेत आलेली आहे.
अर्थसंकल्पामध्ये शहरातील बगीचे,इमारती बांधकाम, स्मशानभुमी/दफनभुमी सुधारणा,नविन रस्ते व शहरातील रस्त्यांची दुरुस्ती,नविन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, आवश्यक विद्युत व्यवस्था,नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीशुध्दीकरण यंत्रणा बसविणेसाठी तरतुद करण्यात आली आहे.तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण व दुर्बल घटकांसाठी विधिवत तरतुद करण्यात आली आहे. शहरामध्ये राष्ट्र पुरुषांचे व समाज सुधारकांचे पुतळे सुशोभिकरण करणेकामी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुद करण्यात आली आहे.
नगरपरिषदेस नगरोत्थान अभियान राज्यस्तर (भुयारी गटार योजना) अनुदान मंजुर असून सदर मंजुर अनुदानामधून सांगोला शहरातील सांडपाण्याची शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केल्याने पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरामध्ये पर्यावरण पुरक उपक्रम जोपासला जात आहे.या सर्वसाधारण विशेष सभेस नगराध्यक्ष आनंदा माने, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी,सर्व विषय समित्यांचे सभापती व सर्व नगरसेवक,विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
========================== स्मार्ट सांगोलेच्या निर्मीतीत सहभागी होऊया :
सांगोला शहराच्या प्रगतीला नवी गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी नगरपरिषदेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा सुधारीत अर्थसंकल्प आणि सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वानुमते मंजुर करण्यात आला. शिक्षण,आरोग्य,रस्ते,पाणीपुरवठा आणि पर्यावरण यासोबतच विद्यार्थी,युवक,महिला, जेष्ठ मंडळी व दिव्यांग बांधवासाठी विशेष तरतुदींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे. “चला,नियोजन करुया,सांगोलेच्या शाश्वत विकासाचे तसेच समृध्द आणि स्मार्ट सांगोलेच्या निर्मीतीत सहभागी होऊया.”
– नगराध्यक्ष आनंदा माने ==========================अर्थसंकल्पामधील तरतुदी :
सांगोले नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये नगरोत्थान अभियान राज्यस्तर (भुयारी गटार योजना),अधिसुचित विशिष्ठ नागरी सेवा सुविधा पुरविणेसाठी अनुदान,नगरोत्थान अभियान जिल्हास्तर,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना,दलितेत्तर योजना,वैशिष्ट्यपुर्ण योजना,विशेष वैशिष्ट्यपुर्ण योजना,विशेष रस्ता अनुदान,अल्पसंख्यांक बहूल क्षेत्र विकास योजना,रमाई आवास घरकुल योजना,शाश्वत विकास धोरण,स्वच्छ महाराष्ट्र अभियान,प्रधानमंत्री आवास योजना इत्यादीकामी तरतुद करण्यात आली आहे.
===================================
More Stories
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने
कर्तृत्वान नेतृत्वाची अकाली एक्झिट
जि.प.व पं.स.निवडणूकीसाठी सांगोल्यात मतदान यंत्रणा सज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी