कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली

सांगोला :

सांगोला रोटरी क्लबच्या वतीने कर्करोग तपासणी व याबाबत जनजागृतीसाठी शनिवारी संपूर्ण शहरातून ‘रोटरी रन-२०२५’ ही रॅली काढण्यात आली होती.समाजाला आरोग्य जनजागृतीचा संदेश देणाऱ्या ‘रोटरी रन-२०२५’ या उपक्रमाची सुरुवात शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास रो.डॉ.संदीप देवकते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.

यावेळी,रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीपती आदलिंगे,सचिव विजय म्हेत्रे,माजी नगराध्यक्ष रो.इंजि.मधुकर कांबळे,माजी नगरसेवक रो.दीपक चोथे,रो.इंजि.हमीदभाई शेख,रो.इंजि.संतोष भोसले, रो.इंजि.अशोक गोडसे,रो.इंजि.बिले,रो.इंजि.देशपांडे,रो.इंजि. संतोष गुळमिरे,इंजि.विजय नागणे,रो.डाॅ.साजिकराव पाटील, रो.महेश गवळी, रो.डाॅ.अनिल कांबळे,रो.मिलींद बनकर, रोटरीचे भावी अध्यक्ष माणिकराव भोसले,प्रा.राजेंद्र ठोंबरे, रो.धर्मराज बोराडे यांच्यासह रोटरी क्लबचे इतर सदस्य व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत रोटरी क्लबच्या कार्याला पाठिंबा दर्शविला. ही जनजागृती रॅली महात्मा फुले चौक,स्टेशन रोड,छ.शिवाजी चौक,नेहरु चौक,  जयभवानी चौक,कचेरी रोड,आंबेडकर उद्यान व वंदे मातरम् चौक या शहरातील प्रमुख मार्गावरुन ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचली. रॅलीदरम्यान कर्करोग प्रतिबंध,लवकर निदान आणि नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणारे संदेश फलक झळकत होते.

              ग्रामीण रुग्णालयात रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी,भावी अध्यक्ष रो.माणिकराव भोसले यांनी डॉ.मुल्ला तसेच रुग्णालयातील वैद्यकीय व कर्मचारी स्टाफ यांना रोटरी रनच्या उद्देशाची तसेच कर्करोग तपासणी शिबिरे,जनजागृती कार्यक्रम आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक उपक्रमांची माहिती दिली.
—————————————————————