सामाजिक

सांगोल्याच्या बचत गटातील महिलांची पूरग्रस्तांना मदत

मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्याकडे सुपूर्द केला धनादेश

मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्याकडे सुपूर्द केला धनादेश

सांगोला :

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अशा संकटसमयी पूरग्रस्तांना आपल्याकडूनही कांहीतरी मदतीचा हातभार लावावा,या उदात्त हेतूने सांगोला नगरपरिषद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांनी स्वप्रेरणेने एक सामाजिक बांधिलकी म्हणून ४५ हजार रुपयांचा धनादेश सांगोला नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्याकडे काल सुपूर्द केला.

सदर मदतीची रक्कम पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला बचत गटांतील पदाधिकार्‍यांनी सांगोला नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांची भेट घेवून त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.यावेळी,सर्व बचत गटांचे प्रतिनिधी म्हणून कर्तव्य शहरस्तर संघाच्या अध्यक्षा सुनंदा घोंगडे,सचिव मनिषा हुंडेकरी,सदस्या ज्योत्स्ना बनसोडे,शकुंतला खडतरे व स्वप्नाली धोकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन पाडे,सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे,बिरप्पा हाके,शरद थोरात,श्रीमती जयश्री खडतरे,समूह संसाधन व्यक्ती श्रीमती सविता लोखंडे,श्रीमती कोमल चांडोले,श्रीमती सारिका लोखंडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————————————

महिलांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी वाखाणण्यासारखी :

बचत गटातील महिलांनी पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी केलेली मदत म्हणजे समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे.पूरग्रस्तांच्या प्रती महिलांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी ही वाखाणण्यासारखी असून त्यांच्या या उपक्रमाबद्दल नगरपरिषद आभारी आहे.
– मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button