श्रीकांतदादा देशमुख यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
सांगोला :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,सोलापूर जिल्ह्यातील व विशेषत: सांगोला तालुक्यातील राजकिय परिस्थितीबाबत चर्चा करण्याकरिता भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी आपले जेष्ठ बंधू शशिकांतभाऊ देशमुख यांचेसह राज्याचेे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंंबई येथे नुकतीच भेट घेतली.
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष असताना श्रीकांतदादा देशमुख यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वांचेच लक्ष वेधून घेत तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह पक्षाच्या इतर नेतेमंडळींशी चांगलीच जवळीक साधली होती.
आपले जेष्ठ बंधू व भाजपाच्या किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख यांचेसह त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंंबई येथील त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेवून नवरात्रौत्सव व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगोला तालुक्यातील राजकिय परिस्थितीबाबत चर्चाही केली.
—————————————————————