सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

सांगोला :

सध्या,सुरु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सांगोला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद उमेदवार व 8 पंचायत समिती गणातील उमेदवारांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला.

यामध्ये,दीपकआबा साळुंखे-पाटील गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व घेरडी जि.प.गटाचे उमेदवार अनिल मोटे, महूद जि.प.गटाचे उमेदवार व भारतीय जनता पार्टीचे उत्तम खांडेकर,डॉ.परेश खंडागळे,पं.स.उमेदवार डॉ.स्वाती परेश खंडागळे,कडलास जि.प.गटाच्या उमेदवार संचिता दत्तात्रय टापरे,चोपडी ग्रा.पं.सदस्य अनिल जगदाळे,पाचेगाव बु.चे उल्हास बिले,शहाजीबापू पाटील गटाचे शिवसेना सहकार सेना जिल्हाध्यक्ष सदानंद पांढरे,जुनोनी ग्रा.पं.सदस्य व पॅनल प्रमुख आबा पाटील,बलवडी गावचे माजी उपसरपंच व चोपडी जि.प.गटाचे उमेदवार विकास मोहिते,घेरडीचे पं.स. उमेदवार श्रीनिवास करे, अजनाळे पं.स.गणाचे अक्षय भजनावळे,चिकमहूद पं.स.गणाचे देवदत्त भोसले, राजुरी पं.स.गणाचे काकासाहेब बंडगर, कोळा जि.प.गटाचे सदानंद पांढरे, पं.स.गणाचे विद्या उल्हास बिले,हातीद पं.स. गणाचे तात्यासो बाळासाहेब पाटील इ.उमेदवारांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

                 याप्रसंगी,राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) चे सांगोला तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत,युवा नेते महेश नलवडे,दत्ता टापरे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी वरील सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील व कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.                                       ===================================