सांगोला :
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळ येथील तिरुवनंतपुरम याठिकाणी कर्ज वितरण व क्रेडिट कार्डचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.या पार्श्वभूमीवर, काल शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सांगोला नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी यांच्या दालनात नगराध्यक्ष आनंदभाऊ माने व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते सुमारे 30 पथ विक्रेत्यांना (फेरीवाल्यांना) पीएम स्वनिधी अंतर्गत कर्जाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी,नगराध्यक्ष आनंद माने यांनी उपस्थित पथ विक्रेत्यांना मिळालेले कर्ज वेळेत परतफेड करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा (PMSVANidhi) अद्याप लाभ घेतला नसेल,अशा पथ विक्रेत्यांना या योजनेची माहिती देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यासमयी,पदाधिकारी,कर्मचारी व लाभार्थी यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात आभासी (Virtual) पद्धतीने सहभाग नोंदविला. यावेळी,बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक नागेश गुंजोटे,युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्ज व्यस्थापक प्रवीण खटकाळे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन