सांगोला :
सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक, शांततापूर्ण व नियमानुसार पार पडावी,यासाठी मतदान यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असल्याची माहिती मंगळवेढा उपविभागाचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2026 साठी सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल) व विद्यामंदिर प्रशाला,सांगोला या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक व दोन यांचे पहिले प्रशिक्षण काल शनिवारी पूर्ण करण्यात आले असून या प्रशिक्षणासाठी 1380 प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी दिले होते.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक,शांततापूर्ण व नियमानुसार पार पडावी,यासाठी काल मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सांगोल्याच्या तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत व समाधान वाघमोडे यांनी मतदान प्रक्रिया ईव्हीएम,व्हीव्हीपॅट हाताळणी,मतदार ओळख पडताळणी,आदर्श आचार संहिता,कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी 32 झोनल अधिकारी उपस्थित होते.
तसेच विद्यामंदिर प्रशाला, सांगोला या ठिकाणी 14 वर्ग खोल्यामध्ये 14 झोनल ऑफिसर व मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव आणि त्यांचे सहकारी यांचे सह हॅन्डसाॅन मशीनचे ट्रेनिंग देण्यात आले. यावेळी तलाठी,महसूल सेवक उपस्थित होते,असे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी सांगितले.
=================================
आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल :
शनिवारी अर्ज माघारी घेण्याचा दुसरा दिवस असूनही सर्व उमेदवार तटस्थ राहिल्याने काल एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. तसेच निवडणूक प्रक्रिया,निवडणूक प्रशिक्षण, क्लासरुम व हँडसॉन प्रशिक्षण पूर्ण झाले असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्यामुळे आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल,असा विश्वास आहे.
– तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत.
More Stories
कर्तृत्वान नेतृत्वाची अकाली एक्झिट
प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत सांगोल्यात नगराध्यक्ष आनंद माने यांनी फेरीवाल्यांना केले धनादेशाचे वितरण
सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज – तहसीलदार संतोष कणसे