सांगोला तालुक्यातील शेकाप व इतर पक्षातील 450 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

सांगोला :

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मलबार हिल येथील त्यांच्या निवासस्थानी सांगोला तालुक्यातील शेकाप व अन्य विविध पक्षांतील सुमारे 450 हून अधिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून यामुळे सांगोला तालुक्याच्या राजकारणात अलिकडे मोठी उलथापालथ होत असल्याची चर्चा चालू आहे.

हालग्या व ढोल वाजवत सांगोल्यातून जवळ-जवळ 100 हून अधिक गाड्यांचा ताफा आणि 450 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा समूह भगवे झेंडे,स्टिकर आणि बॅनर लावून मुंबईकडे रवाना झाला होता.मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मलबार हिल येथील नंदनवन परिसर सांगोल्यातील तरुणांच्या जय जयकाराच्या घोषणांनी दुमदुमून गेला.पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी आमदार शहाजीबापूंच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने धनगरी फेटा,घोंगडी व काठी देऊन सांगोल्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले तर,आभार उद्योगपती मनोज ढोबळे यांनी मानले.या प्रवेशामुळे आगामी काळात सांगोला तालुक्यात शिवसेना अधिक बळकट होईल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
                       =========================

शिवसेनेत प्रवेश करणारे मुख्य चेहरे :

धायटीचे माजी सरपंच रवी भाऊ मेटकरी, सांगोला शहरातील उद्योगपती मनोज ढोबळे व त्यांची मित्रमंडळी,शिवणेचे सरपंच दादासाहेब घाडगे,युवक नेते प्रताप पाटील, चेअरमन विक्रम घाडगे,विलास घाडगे, कमलापूरचे चेअरमन नवनाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रेय सावंत व मित्र परिवार,घेरडी गटाचे बंडू मामा मोटे, चिंचोलीचे ग्रा.पं.सदस्य संजय शेजाळ, उपसरपंच लक्ष्मण खांडेकर,शिवाजी सरगर, दत्ता खरात,दीपक घाडगे,ज्ञानेश्वर शिनगारे, विशाल बनसोडे,सागर पारसे,हलदहिवडीचे विनोद बोरकर,शिरभावीचे ग्रा.पं.सदस्य अण्णासाहेब मेटकरी व इतर,एखतपुरचे बापू पाटोळे व सहकारी,महूदचे विजयसिंह खबाले,प्रवीण मेटकरी,मयूर टिंगरे,योगेश लुबाळ,महिमचे सचिन कारंडे,राहुल नारनवर,हनुमंत नारनवर,कटफळचे उपसरपंच मोहन खरात,रमेश नरके तसेच
वझरेचे आकाश कोकरे व स्वप्निल जावीर तर,बलवडी,नाझरे,अजनाळे,तिसंगी,हंगिरगे,काळेवाडी,नराळे,पारे,डिकसळ व सोनंद आदी गावांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
=========================

सांगोल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर काढू :

सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवू.भविष्यात सांगोल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही उत्तर काढू,असा शब्द देतो.              – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
=========================

निर्णय प्रक्रियेत तरुणांना सोबत घेऊ :

सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे ध्येय आहे.यासाठी सांगोल्याच्या तरुणांची एक मोठी फळी निर्माण करु.आम्ही विकासाचे विधायक राजकारण आणि समाजकारण करु.निर्णय प्रक्रियेत सर्व समाजातील तरुणांना आम्ही सोबत घेऊ.              – शहाजीबापू पाटील =========================

मान्यवरांची उपस्थिती :

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार निलेश राणे,सोलापूर जिल्हा निरीक्षक आमदार संजय कदम,महिला आघाडीच्या नेत्या साईना एनसी यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, नगराध्यक्ष आनंदभाऊ माने,उपनगराध्यक्ष नितीन इंगवले,युवा सेनेचे सचिव सागर पाटील,नगरसेवक सर्वश्री पप्पू धनवजीर, माऊली तेली,काशिलिंग गावडे,चैतन्य राऊत,अरुण पाटील,सोमेश यावलकर, कीर्तीपाल बनसोडे,विजयसिंह इंगोले,  पं.समिती उपसभापती अजय सरगर,युवा नेते उमेश पाटील,युवा सेना नेते गुंडा दादा खटकाळे,बाळासाहेब आसबे,धनंजय काळे, शहाजी दिघे,जगदीश पाटील,अमोल नलवडे,विक्रांत नलवडे,संपर्कप्रमुख उदय घाडगे,बबलू इंगवले,नवनाथ खटकाळे, तानाजी भोसले,विजय मगर,अनिकेत मगर, युवराज कारंडे,दीपक दिघे,विजयबापू बनसोडे,मिरज ढेरे,राजू हजारे,ओंकार वलेकर,राजेंद्र खरात,अमोल तेली,प्रसाद चव्हाण,अमित पाटील,अमोल सरडे, समाधान महापुरे इ.
==========================