सामाजिक

सांगोल्याच्या आपुलकी प्रतिष्ठानकडून २५० दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी झाली गोड

१३१ दात्यांचे मोलाचे योगदान

सांगोला :

सांगोला शहरासह तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे २५० दुष्काळग्रस्त,शेतमजूर,कष्टकरी व गरजू कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत गरजू कुटुंबांना दिवाळी फराळासह भाऊबीजेची साडी,सुगंधी तेल, उटणे,साबण आदी साहित्याचे वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आपुलकी प्रतिष्ठान ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था दरवर्षी दिवाळीच्या सणानिमित्त गरीब,वंचित आणि गरजू कुटुंबांना फराळाचे वाटप करुन त्यांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम राबविते. यावर्षी तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना दिवाळीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने प्रतिष्ठानने विशेष दिवाळी फराळ वाटप उपक्रमाचे आयोजन केले होते.त्यानुसार, वाढेगाव, आलेगाव,मेडशिंगी, चिंचोली,शिरभावी,एखतपूर, सावे,कडलास,चांडोलेवाडी,कमलापूर,गोडसेवाडी,राजुरी,उदनवाडी,पाचेगाव,बलवडी तसेच सांगोला शहरातील गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना दिवाळी फराळ व भाऊबीजेची साडी यासह सुगंधी तेल,उटणे,साबण आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे अनेक गरीब व कष्टकरी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाचे क्षण फुलले. सणासुदीच्या काळात समाजातील वंचित घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आपुलकी प्रतिष्ठानचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.
        =========================

१३१ देणगीदारांचे मोलाचे सहकार्य :

आपुलकी प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनाला यावर्षी देणगीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दिवाळी फराळ वाटप उपक्रमासाठी तब्बल १३१ दानशूर व्यक्तींनी एकूण १ लाख २१ हजार ७३१ रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. देणगीदारांच्या या सहकार्याबरोबरच प्रतिष्ठाननेही स्वतःचा आर्थिक वाटा उचलून हा उपक्रम यशस्वी केला. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळेच २५० गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणे शक्य झाले.माणुसकीचा दिवा तेवत ठेवत समाजातील गरजूंच्या आयुष्यात आनंदाची दिवाळी साजरी करणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
==============

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button