महत्वाच्या बातम्या

कृष्णाई महिला अर्बनच्या घेरडी शाखेचे होणार मंगळवारी उदघाटन

सांगोला :

ठेवीदारांसह कर्जदारांच्याही उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या सांगोला येथील कृष्णाई महिला अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीच्या घेरडी शाखेचे उदघाटन श्री जगदगुरु पंचांचार्य प्रसिदंतु श्री.ष.ब्र.राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभ हस्ते येत्या मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक साहेबराव पोळ व सहसंस्थापक नितीन खटकाळे यांनी दिली.

सांगोला येथील कृष्णाई महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेने सुरुवातीपासून आजतागायत ठेवीदारांच्या गुंतवणूकीला चांगला परतावा देण्याची हमी देऊन त्यांच्या ठेवीवरील सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिल्याने कृष्णाई महिला अर्बनच्या व्यवहारांबाबत एकप्रकारची विश्वासार्हता निर्माण झाली.त्यामुळे, ठेवीदारांनीही या संस्थेत गुंतवणूक करुन आपल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

               ठेवीदारांच्या गुंतवणूकीला चांगला परतावा देण्याच्या उद्देशाने कृष्णाई महिला अर्बन या संस्थेने गरजू व प्रामाणिक ग्राहकांना त्यांच्या विवीध छोट्या मोठ्या व्यवसायासाठी कमी व आवश्यक तेवढ्या कागदपत्रांवर आकर्षक व्याजदरांसह जलदगतीने कर्जे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केल्यामुळे कर्जदारांनाही आपल्या व्यवसायात प्रगतीचा टप्पा गाठणे शक्य झाले.या संस्थेने व्यापारी व व्यावसायिकांची वेळेत आर्थिक गरज भागविल्याने अनेकांचे संसार उभे राहिल्यामुळे कर्जाची वसुलीही 100 टक्के होत आहे.

एकंदरीत एकीकडे,ठेवीदारांच्या गुंतवणूकीला सुरक्षितता व चांगला परतावा मिळत असल्याने संस्थेबद्दल निर्माण झालेला विश्वास आणि दुसरीकडे,व्यापारी व व्यावसायिकांची वेळेत भागत असलेली आर्थिक गरज याची चांगली सांगड घातल्याने कृष्णाई महिला अर्बन ही संस्था सध्या प्रगतीपथावर आहे.ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर संस्थेची घेरडी येथे नवीन शाखा येत्या मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी सुरु होत असून या शाखेचे उदघाटन श्री जगदगुरु पंचांचार्य प्रसिदंतु श्री.ष.ब्र. राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभ हस्ते सायंकाळी 5 वाजता होणार आहे.तरी,या उदघाटन समारंभास कृष्णाई महिला अर्बनचे ठेवीदार, कर्जदार,सभासद,हितचिंतक व मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थापक साहेबराव पोळ व सहसंस्थापक नितीन खटकाळे यांनी केले आहे.
===========================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button