
सांगोला :
सध्या,सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीत सर्वसामान्य व गरजू नागरिकांना आरोग्यसेवा मिळवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे,येणाऱ्या वर्षात गोरगरीब व गरजू रुग्णांसह सर्व नागरिकांना शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्यापरीने सामाजिक बांधिलकी जपावी.तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, डॉक्टरांनी गरजू नागरिक व रुग्णांना जास्तीत जास्त मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार द्यावेत, असे आवाहन सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून सामाजिक बांधिलकीतून रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या सांगोला तालुक्यातील डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.धन्वंतरी जयंती व धनत्रयोदशीचे औचित्य साधून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या सोहळ्यात सांगोला तालुक्यातील ५० हून अधिक डॉक्टरांचा शाल,गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आम.डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी व रोटरी क्लब ऑफ,सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख हे स्वतः हृदयरोग तज्ज्ञ असून त्यांच्या पत्नी डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. वैद्यकीय क्षेत्राशी असलेले त्यांचे नाते आणि भगवान धन्वंतरी जयंतीचे औचित्य साधून श्री. अरुण पाटील व डॉ.निरंजन केदार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याला तालुक्यातील डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकशास्त्र व आरोग्याची आद्य देवता भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने आणि धन्वंतरी स्तवनाने झाली.सांगोल्यातील ज्येष्ठ डॉक्टर कै.डॉ.श्रीकांत भोसेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त उपस्थित सर्व डॉक्टरांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख आणि रोटरी क्लब ऑफ,सांगोला यांच्या वतीने उपस्थित डॉक्टरांचा शाल,गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख,ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.प्रभाकर माळी,डॉ.अमरसिंह शेंडे,रोटरी क्लबचे अध्यक्ष माणिक भोसले तसेच रोटरी क्लबचे सदस्य अनिल इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले.डॉक्टरांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान आणि समाजाप्रती असलेल्या सेवाभावी वृत्तीचे यावेळी कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय बंडगर यांनी केले तर,सूत्रसंचालन डॉ.निरंजन केदार यांनी केले.यासमयी,बहुसंख्य डॉक्टर,रोटरी क्लबचे अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य तसेच आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टीचे सदस्य उपस्थित होते.
=========================
सत्कारमूर्ती :
डॉ.मच्छिंद्र सोनलकर, डॉ.अनिल कांबळे, डॉ.शिवराज भोसले, डॉ.रणजीत केळकर, डॉ.महेश राऊत,डॉ.संतोष पिसे,डॉ.एच.व्ही.गावडे,डॉ. दत्तात्रेय इंगोले, डॉ.ढाळे, डॉ.प्रशांत देशमुख,डॉ.राजाराम लवटे,डॉ.बसवेश्वर पाटील,डॉ.कोमल कांबळे,डॉ.विनायक डमकले,डॉ.उषा देशमुख, डॉ. अभयसिंह देशमुख, डॉ. फिरोज तांबोळी,डॉ. अभिजीत सोनलकर,डॉ. शैलेश डोंबे,डॉ. प्रमोद बोराडे,डॉ.सचिन गवळी, डॉ.विजय इंगवले,डॉ. प्रवीण पैलवान,डॉ.अजित नवले,महादेव कोळेकर, डॉ.विवेकानंद विभुते,डॉ. सारिका लवटे,डॉ.सुनील लवटे,डॉ.प्रज्ञा लवटे,डॉ. अमर जाधव,डॉ.किरण जगताप,डॉ.सैफुल तांबोळी,डॉ.विनोद केदार, डॉ. सुपर्णा केळकर,डॉ. मुल्ला,डॉ.शिंगण,डॉ. धनंजय गावडे,डॉ. महावीर आलदर,डॉ.पटेल (कोळा) यांच्यासह ५० हून अधिक डॉक्टरांचा सत्कार व सन्मान यावेळी करण्यात आला.
=========================



